भाजपा नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा यशस्वी ; ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान
मालवण
जलसंधारण विभागाच्या माध्यमातून मसुरे रमाई नदीतील गाळ उपशाचे काम इंधनासाठी असलेला निधी संपल्याने बंद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर माजी जी प अध्यक्ष सौ सरोज परब, माजी प स सदस्य महेश बागवे, शिवाजी परब तसेच मसुरे गावातील स्थानिकांनी हे काम समाधानकारक नसून पुन्हा गाळ उपसा सुरू करण्याची मागणी भाजपा नेते, माजी खा. निलेश राणें कडे केली होती. त्यावर निलेश राणे यांनी मसुरे येथे जाऊन प्रत्यक्ष पहाणी करत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनाची पूर्तता झाली असून गाळ काढण्याच्या कामास पुन्हा सुरवात झाली आहे. सोमवारी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी मसुरे गावचे सुपुत्र व भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विक्रांत नाईक, अशोक मसुरकर, अभि दुखंडे तसेच शेतकरी उपस्थित होते.
या नदीतील गाळ उपसा काम थांबू नये यासाठी जलसंधारण विभागाशी पत्रव्यवहार करत निलेश राणे यांनी तातडीच्या निधी उपलब्धतेची मागणी केली होती. त्यानुसार आठ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे रमाई नदीतील गाळ उपसा पुन्हा सुरू झाला असून मसुरे ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.