You are currently viewing ओसरगाव येथे चालत्या खासगी बसने अचानक घेतला पेट

ओसरगाव येथे चालत्या खासगी बसने अचानक घेतला पेट

दुर्घटनेत बस जळून खाक ; सुदैवाने प्रवासी बचावले

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर खासगी लक्झरी बसने अचानक पेट घेतल्याची दुर्घटना बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत बस जळून खाक झाली. मात्र सुदैवाने आतील प्रवासी बचावले.

मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ ही दुर्घटना घडली. ही बस पुण्याहुन गोव्याच्या दिशेने जात होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. बस मध्ये ३५ प्रवासी होते. मात्र या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा