You are currently viewing कृपण होऊ नका कधी

कृपण होऊ नका कधी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*कृपण होऊ नका कधी…*

संधीसाधू नकोच होऊ अरे माणसा पहा जरा
ताट वाढले वसुंधरेने निसर्ग सारा हराभरा
खूप दिले रे खूप दिले रे फुफाट वाहे नदी नदी
संधी द्यावी इतरांनाही कृपण होऊ नको कधी…

विश्वाचे हे अंगण आहे दिले विधिने तुला गड्या
कर्मकरंटा होऊ नको रे नकोच मारू उगा उड्या
ठेव जरा तू हात मोकळा गरजूंसाठी जरा सदा
माहित नाही कोठून येईल पाठीवरती सोटा,गदा…

कर्ण जरी तू झाला नाही लुटू नको रे कधी कुणा
जाण्यापूर्वी ठेवून जा ना सद् गुणांच्या काही खुणा
परोपकारी परंपरारे माती येथील उपजाऊ
पाण्यामध्ये राहून सुद्धा नको कोरडा तू राहू…

एका हाते दिल्यास आपण दुपटीने ते मिळते पहा
हात ठेव तू सदाच वरती एक दिवस बनशिल महा
देण्यासारखे पुण्य न दुसरे त्यागातून ती कीर्त गड्या
सदैव ठेवी मनास जागे आणि खिडक्या रे उघड्या…

माणूस हो रे अरे माणसा टाकून दुर्गुण तू सारे
कुठून येतील कसे वाहतील सांगता न येती वारे
माणूस होणे महा कठीण रे प्रयत्न सोडू नको जरा
किती ही सुंदर आहे पहा ना देत राहते वसुंधरा …

देणे शिकू या वसुंधरेचे वाऱ्याचे ते औदार्य
सूर्य नि वारा करून टाकती मेघडंबरीचे कार्य
मेघ बरसता सचैल न्हाते रोमांचांनी थरथरते
भरभरून ती पिकते माती दान देऊनी खुष होते…

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २७ मे २०२३
वेळ: दुपारी १२/४६

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 1 =