You are currently viewing खरीप हंगामासाठी माजगाव ग्रामपंचायत मध्ये 50 टक्के अनुदानावर भात बियाणे वाटप…

खरीप हंगामासाठी माजगाव ग्रामपंचायत मध्ये 50 टक्के अनुदानावर भात बियाणे वाटप…

सावंतवाडी

खरीप हंगामासाठी शेतकरी बांधवांना माजगाव ग्रामपंचायत कडून 50 टक्के अनुदानावर भात बियाणे वाटप करण्यात येत असून याचा शुभारंभ आज सरपंच सौ अर्चना सावंत व उपसरपंच बाळा वेजरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

माजगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयात हे भात बियाणे उपलब्ध करून देण्यात आले असून शेतकऱ्यांनी येताना आठ अ व सातबारा आणायचा आहे असे आवाहनही सरपंच सौ सावंत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 1 =