You are currently viewing १ फेब्रुवारीला कै. रवींद्रनाथ मुसळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोपुरी आश्रमात दिव्यांग मेळावा.!

१ फेब्रुवारीला कै. रवींद्रनाथ मुसळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोपुरी आश्रमात दिव्यांग मेळावा.!

कणकवली

तालुक्यातील गोपुरी आश्रम या ठिकाणी कै. रवींद्रनाथ मुसळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ १ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठीक १०:३० वा. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा भव्य दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन एकता दिव्यांग विकास संस्थाध्यक्ष सुनील सावंत यांनी केले आहे. तसेच या मेळाव्या दरम्यान, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींचा सन्मान होणार आहे. १२ वी. पास, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या दिव्यांग बांधवांचा देखील यावेळी सन्मान केला जाणार आहे. तसेच मी पाहिलेली दिव्यांग व्यक्ती, मी अनुभवलेला दिव्यांग व दिव्यांगांची व्यथा या विषयावर किमान ५ मिनिटे अशी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम नाव नोंदवणाऱ्या १५ जणांना स्पर्धेत सहभागी होता येणार. इच्छुकांनी सचिन सादीये मोबा. ९८६०७१८९४९ यांच्याशी संपर्क करून आपली नाव नोंदणी करून घ्यावे.

सदर दिव्यांग मेळाव्यास समाज कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग, रमेश पवार ( तहसीलदार कणकवली ), डॉ. विद्याधर तायशेट्ये, डॉ. धनंजय रासम, डॉ प्रफुल्ल आंबेरकर, संदीप परब ( संविताश्रम पणदूर ), दीपक बेलवलकर ( व्यापारी महासंघ अध्यक्ष ) यांना भव्य दिव्यांग मेळाव्यास निमंत्रित करण्यात येणार आहे. अशी माहिती देखील एकता दिव्यांग विकास संस्थाध्यक्ष सुनील सावंत यांनी दिली.

अधिक माहितीसाठी सचिन सादिये ९८६०७१८९४९, सुनील सावंत ९४२०६५४६२४, मयुर ठाकूर ९११९५३२८७० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा