*पावसामुळे अंतिम सामना होणार राखीव दिवशी*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलच्या १६व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (२८ मे) पावसामुळे होऊ शकला नाही. आता सोमवारी (२९ मे) राखीव दिवशी विजेत्याचा निर्णय होणार आहे. संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसामुळे स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी बोलून पंचांनी आजचा सामना न करण्याचा निर्णय घेतला.
अहमदाबादमध्ये संततधार पावसामुळे आज सामना होऊ शकला नाही. रात्री ११ वाजता पाऊस उशिरा थांबला, पण मैदान खेळण्यायोग्य होण्यासाठी किमान एक तास लागेल. त्यानंतर सामना झाला असता तर दोघांनाही प्रत्येकी पाच षटकेच मिळाली असती. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधारांशी बोलून पंचांनी आजचा सामना पुढे ढकलला. आता तो सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून राखीव दिवशी खेळवला जाईल.
रात्री नऊ वाजता पाऊस थांबला होता आणि मैदान जवळपास खेळण्यायोग्य झाले होते, पण पाऊस पुन्हा आला. त्यानंतर रात्री ११ वाजता पाऊस थांबला.
आयपीएलने या सामन्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. त्यांनी लिहिले की, आयपीएलची फायनल २९ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना राखीव दिवशी होणार आहे. आजची तिकिटे उद्या वैध असतील. आम्ही तुम्हांला तिकीट सुरक्षित ठेवण्याची विनंती करतो.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-