अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविले
बांदा
पाडलोस येथे कालवा पुलाजवळ आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास वेंगुर्ले-पाडलोस-बांदा एसटी व दुचाकीत भीषण अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी उसळली व एसटीला आदळली असे स्थानिकांनी सांगितले.
अपघातात दुचकीस्वार सावळाराम सूर्यकांत घाटये (वय 36, रा. तळवणे) याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी जखमीला तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबुळी येथे पाठविण्यात आले. बांदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.