वेंगुर्ला
28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिन. या निमित्ताने भाजपने आपल्या वेंगुर्ले येथील कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव साजरा केला. वेंगुर्ल्यातील निवृत्त शिक्षक व साहित्यिक अजित राऊळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व उपस्थित कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. अजित राऊळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शिक्षण व क्रांतिकार्य या विषयावर उपस्थितांचे प्रबोधन केले. यावेळी विचार मांडताना राष्ट्रभक्तीची धगधगती ज्वाळा , अखंड हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्ते , भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि हिंदुतेजसुर्य , भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रनेते , विचारवंत , तत्वज्ञ असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते असे सांगून, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी केलेला त्याग यांची महती विविध उदाहरणातून त्यानी स्पष्ट केली.
या कार्यक्रमा आधी मोदीजींच्या *मन की बात* चेही कार्यकर्त्यांनी अवलोकन केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , नगरसेवक प्रशांत आपटे , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर , सोशल मिडीयाचे श्रीकृष्ण उर्फ राजु परब , ओबीसी सेलचे शशी करंगूटकर इत्यादी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व व आभार प्रसंन्ना देसाई यांनी केले .