You are currently viewing प्राजक्ता माळी पडली दापोलीकरांच्या प्रेमात..

प्राजक्ता माळी पडली दापोलीकरांच्या प्रेमात..

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहर व तालुक्यातील निसर्ग संपदा जोपासणे हे आपल्या हातात आहे. मी दापोलीच्या प्रेमात पडली आहे हेच प्रेम मला येथे आज घेऊन आले. अशी कौतुकास्पद व दापोलीकरांना अभिमान वाटेल अशी दाद मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी हीने दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरातील महत्वपूर्ण दोन नवीन स्टेचू आयकॉनच्या सुशोभीकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी दापोलीत आली होती.

यावेळी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना ती बोलत होती. येथील निसर्ग सौंदर्य, दापोली तालुक्यातील समुद्र किनारे, निसर्ग संपदा, खाद्य संस्कृतीचे मला कौतुक आहे. या सुंदर निसर्गरम्य दापोलीचे आपण नागरीक आहात. तुमच्याबद्दल मला हेवा वाटतो, खुप मस्त आहे. मला तुमच्याबद्दल जेलसी वाटते, आम्हाला मुंबईत नाही अनुभवता येत असेही तीने यावेळी नमुद केले.

सांस्कृतिक कलाक्षेत्रातही दापोली बदलतय, ऍडव्हान्स होतय. कोरोना कालावधीनंतर आपल्याला पहिल्यांदा दापोली येथे येण्याची संधी मिळाली. यामुळे मी खूपच आनंदी आहे. दापोली विषयी असलेल प्रेम मला येथे घेऊन आले आहे. प्रोग्राम ठरला होता पण दापोलीत जायचे अस कळले तेव्हा मला खुप आंनद झाला असे तीने यावेळी सांगताच दापोलीकरांनी टाळ्यांच्या गजरात तीचे स्वागत केले.

दापोली शहराच्या विकासासाठी शिवसेना आमदार योगेश कदम यांनी दापोली शहरातील मुख्य रस्ता सुशोभिकरण व दापोलीत मोठे गार्डन, व्यायामशाळा, ओपन एम्पि थिएटर, जीम यासाठी सव्वा दोन कोटी रूपये मंजूर करुन घेतल्याची महत्वपूर्ण घोषणा यावेळी केली. यावेळी बुरोंडी नाका येथे घातलेल्या ‘द फर्न समाली रिसॉर्ट’ चे कौतूक केले. मच्छि व मटण मार्केट सुसज्ज इमारतीमध्ये येत्या काही महिन्यात शिफ्ट होईल, इमारतीचे ९५ टक्के काम झाले आहे. यासाठी कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली.

एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक (बुरोंडी नाका) तसेच दापोली शहराचे प्रवेशद्वार मच्छिमार्केट चौक येथे ‘द फर्न समाली रिसॉर्ट’ व दापोली नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शहर प्रवेशद्वारावर कोळी स्टेच्यू तर बरोंडी नाका येथे गो मातेचा स्टेच्यू उभारण्यात आला आहे. ही संकल्पना द फर्न समाली रिसॉर्ट ची होती, त्यासाठी नगरपंचायत व लोकप्रततिनिधींचे उत्तम सहकार्य मिळाल्याने कार्य सिद्धिस गेली आहे. असे आवश्यक व शक्य ते सहकार्य यापुढेही आम्ही करू अशी ग्वाही द आमदार ‘द फर्न समाली रिसोर्ट‘ च्या संचालिका प्रतिमा कळेकर यांनी दिली. निसर्ग जपूनच आपला पर्यटन विकास हे आमचे ध्येय असून आम्ही शेतीही रसायन मुक्त करतो यासाठी गो धन, गो-माता जपायला हवी असेही सौ. कळेकर यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला आमदार योगेश कदम, द फर्न समालीचे चंदन कळेकर,मुख्याधिकारी देवेंद्र नागी, दापोलीच्या नगराध्यक्षा परवीन शेख,उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर,गटनेते प्रकाश साळवी व सर्व नगरसेवक,मुख्याधिकारी देवानंद ढेकळे,सिद्धिविनायक मित्र मंडळ अध्यक्ष प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ राजू दाबके आदी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्मचारी मंगेश जाधव यांनी केले.

———————————————————–

🏍️ *हिरो दिवाळी धमाका* 🏍️ 💥💫🎉💥💫🎉

👉 *HF डिलक्स* आणि *सुपर स्प्लेंडर* वर *रु. 2100* कॅश डिस्काउंट

👉 *स्कुटरवर* *रु 4100* पर्यंतचा फायदा

👉 *एक्स्ट्रिम सिरीज* व *एक्सपल्स 200T* वर एक्सचेंज किंवा लॉयल्टी डिस्काउंट *रु. 5000* शिवाय *आकर्षक फायनान्स स्किम,* एक्सचेंज उपलब्ध.

👉 मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या.

💥 *सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकमेव अधिकृत वितरक*

🏍️ *मुलराज हिरो* *MIDC, कुडाळ*🏍️

☎️ *संपर्क : * 02362-223924/223666*
📱 *9607909791*

👉 *अटी लागु.*
👉 *त्वरा करा ऑफर 7 नोव्हेबरपर्यंतच*

*—————————————————–*

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/Snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/SanvadM
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/DpYjUxss3BCA2pBvY66X1o
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : 9404930100 / 8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =