You are currently viewing जनमानसातल्या कार्यकर्त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन यथोचित गौरव

जनमानसातल्या कार्यकर्त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन यथोचित गौरव

*जनमानसातल्या कार्यकर्त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन यथोचित गौरव*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे हिंदवी स्वराज्य संघटना आयोजित शिवराज्यभिषेकाच्या गौरवशाली ३५० व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार व राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्कार २०२३ वितरण सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उंच भरारी घेत समाजाला आदर्शवत होईल असे उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करणे. जी व्यक्ती शेवटपर्यंत समाजासाठी आपले तन-मन-धन लावून समाजकार्यात स्वतःला झोकून देते, मला काय मिळेल याचा यत्किंचितही विचार न बाळगता सतत समाजासाठी जी व्यक्ती झटत असते, अशा व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांची प्रशंसा करून प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
सदर सन्मान सोहळ्यास कामगार नेते व दैनिक मुंबई मित्रचे संपादक अभिजीत राणे, उद्योजिका समाजसेविका संगीताताई गुरव, मराठा समन्वय परिषद महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्ष अनिताताई काळे पाटील, साहित्यिक बालाजी राणे, नाट्य अभिनेत्री सायली पावसकर, कोमल खामकर, संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे, हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जाधव, तसेच सचिव आणि कार्यक्रमाचे आयोजक सूरज भोईर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात जयश्री वाघ यांच्या गीतगायनाने झाली. त्यानंतर बालकलाकार श्रुती हेंडवे हिने राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटीका सादर केली. सन्मान सोहळ्याचे आयोजक सूरज भोईर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शक प्रेमळ संभाषणानंतर सभागृहात नवचैतन्य सळसळले. अनिताताई काळे-पाटील यांच्या मनोगतातून सभागृहात धगधगता अंगार फुलला तर सायली पावसकर यांच्या धीरोदात्त चिंतनशील वक्तव्यानंतर सभागृहात नि:शब्द वैचारिक शांतता पसरली. अध्यक्षीय भाषण करताना संगीताताई गुरव यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले आणि येणाऱ्या काळात अधिक जोमाने आपआपल्या क्षेत्रांमध्ये कार्य करत राहण्यासाठी प्रेरणा दिली.
विनोद हिवाळे यांनी पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तसेच संकल्प संस्था आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली.
सदर कौटुंबिक सोहळ्याचे नीटनेटके सूत्रसंचालन साहित्यिक पत्रकार आणि मराठी साहित्य व कला सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विजय केदासे, सचिन गमरे, सविता हेंडवे, सीमा परिहार, शकीला तांबोळी आणि कपिल क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन हिंदवी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − three =