*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*जगणे एक कला*
~~~~~~~~~~~~
वंदे भारत गाडीने शिरडीहून ठाण्याला परत येण्यासाठी माझ्या दोन नणंदांसोबत मी शिरडी स्टेशनवर एका बाकावर बसले होते.एक साधारण पस्तीशीतील मुलगी पाठीवर बॅगपॅक लटकवून आमच्याशेजारी येऊन बसली.”ऑन्टी
आपके साथ कोई नही?आप तीनो अकेले?” आमच्या वयाकडे बघून कदाचित तिला असे वाटले असावे. मी म्हटलं,”हमारे साथ कौन आयेगा?बच्चे तो विदेशमे है.तो क्या हम सफर नही करे,भगवान है रखवाला.”ती ह्याही वयातील आमचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून फारच impress झाली होती.त्याक्षणी मला वाटले हाच तर जगण्यातला आनंद आहे,कोणा अनोळखी व्यक्तीला आपल्याविषयी आदर वाटावा हे आपल्या जगण्यातले यश आहे.
*Life is beautiful, you must live it*असे मदर टेरेसाने तिच्या आत्मचरित्रात सांगितले आहे.माझ्या ऐंशी वर्षांच्या जीवनात मला हे पुरेपूर पटले आहे.
जन्म ते मृत्यू हा जीवनप्रवास काही सोपा नाही.त्या प्रवासात अगणित वळणे आहेत,चढउतार आहेत,खाच खळगे आहेत,काटेकुटे आहेत,वादळवारे आहेत पण त्याच सोबत मायेचा पाठीवरून फिरणारा हात आहे,वात्सल्य आहे, प्रीतीचा सुगंध आहे,खंबीर आधाराचे हातही आहेत.खळखळणारे पाणी आहे,हिरवा निसर्ग आहे.आता पॅला अर्धा भरला आहे की अर्धा रिकामा आहे हे ज्याचे त्यालाच ठरवायचे आहे. हे ठरविता येणे ही मात्र कला आहे.
काल परवाच आजचे आघाडीचे तरूण कवी श्री गुरू ठाकूर यांची जीवनातील सकारात्मक दृष्टी दाखविणारी एक कविता माझ्या वाचनात आली.माणसाने कसे जगावे हे सांगताना ते लिहितात,
*असे जगावे छाताडावर*
*आव्हानांचे लावून अत्तर*
*नजर रोखुनी नजरेमध्ये*
*आयुष्याला द्यावे उत्तर*
कवितेचे दुसरे कडवे वाचताना तर *जीवन त्यांना कळले हो*याची खात्री झाली.
बघा हं!किती रास्त ओळी आहेत या.
*पाय असावे जमिनीवरती*
*कवेत अंबर घेताना*
*हसू असावे ओठावरती*
*काळीज काढून देताना*
*संकटासही ठणकावून सांगावे*
*ये आता बेहेत्तर*
*नजर रोखुनी नजरेमध्ये*
*आयुष्याला द्यावे उत्तर*
जीवन हे एक चित्र आहे असे माझे मत आहे. त्या चित्रात आकर्षक रंग भरणे हे आपले काम आहे. एखाद्या कलाकारालाच योग्य रंगसंगती काय आहे ते समजते,त्यामुळे जगताना प्रत्येकाने ही कला अवगत करून घेतली ,त्या कलेचा परिपूर्ण अभ्यास केला तर जीवनचित्रातला प्रत्येक बारकावा त्याला चांगला कळेल आणि त्याचे चित्र पहाणार्याला मोहीत करेल.
जाता जाता एक सांगते,
“जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसे भेटतात
काही साथ देतात
काही निघून जातात
हळहळ नको कशाची
जाणार्याला जाऊ द्यावे
वर्तमानात राहू आपण
मागे वळून का पहावे?”
*अरूणा मुल्हेरकर*
*मिशिगन*
२५/०५/२०२३⁰9
*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*
*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*
*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*
*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*
*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*
*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*
*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*
*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*
*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*
👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*
*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️
*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*
*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*
*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________