You are currently viewing सावंतवाडी तालुक्याचा १२ वीचा निकाल ९६.८६ टक्के

सावंतवाडी तालुक्याचा १२ वीचा निकाल ९६.८६ टक्के

मिलाग्रीसची एरिका डिसोजा ९१.३३ टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम

सावंतवाडी

उच्च माध्यमिक शालांत परिक्षा २०२३ अर्थात बारावीचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल ९६.८६ टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या १६५७ विद्यार्थ्यांपैकी १६०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मिलाग्रीस कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी एरिका ऑगस्टीन डिसोजा ही ९१.३३ टक्के गुण मिळवीत तालुक्यात प्रथम आली. श्री पंचम खेमराज महविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा विद्यार्थी ऐश्वर्यानंद सावंत ९१ टक्के गुणांसह द्वितीय तर याच प्रशालेची रिया नाईक हिने ९०.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तालुक्यातील मिलाग्रीस, सांगेली व आंबोली प्रशालांनी आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचा १२ वीचा निकाल ९९.२६ % एवढा लागला आहे. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स विभागात २७२ पैकी २७० विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात प्रशालेत ऐश्वर्यानंद सावंत ९१ टक्के प्रथम, द्वितीय रिया नाईक ९०.५० टक्के तर तृतीय साक्षी मसुरकर ८९.८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. आर्ट्स विभागात मृण्मयी पेडणेकर ८६.१७ टक्के प्रथम, सुहानी नाईक व संजना सावंत टक्के द्वितीय, ट्रीझा फर्नांडिस ७३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर कॉमर्स शाखेत ऐश्वर्यानंद सावंत ९१ टक्के प्रथम, द्वितीय रिया नाईक ९०.५० टक्के तर तृतीय साक्षी मसुरकर ८९.८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सायन्स शाखेतून धनराज कदम ८६.६७ टक्के प्रथम, मधुरा वाडकर ८२.५० टक्के द्वितीय, समृद्धी चव्हाण ७९.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीचा निकाल ९८.५० टक्के एवढा लागला आहे. यात प्रशालेत मुनिरा मिर्झा ९०.३३ टक्के प्रथम, द्वितीय केतकी नाईक ८९.८३ टक्के तर तृतीय क्रमांक देवयानी
कोरगावकर, विरेश सातार्डेकर, जान्हवी सावंत, एल्टन फर्नांडिस यांनी पटकाविला आहे. आर्ट्स विभागात मुनिरा मिर्झा ९०.३३ टक्के गुण मिळवत प्रथम, देवयानी कोरगावकर ८९.६७ टक्के द्वितीय, विरेश सातार्डेकर ८६.६७ टक्के तृतीय तर कॉमर्स शाखेत केतकी नाईक ८९.८३ टक्के प्रथम, जान्हवी सावंत ८९.६७ टक्के द्वितीय, निशिता बावकर ८९.३३ टक्के तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर विज्ञान शाखेत एल्टन फर्नांडिस ८९.६७ टक्के प्रथम, समिक्षा पावसकर ८४ टक्के द्वितीय, संजीव मसुरकर ८३.०५ टक्के तृतीय क्रमांक प्राप्त केला.मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये अंतरा जाधव ६५ टक्के प्रथम, दिव्या परब ६४ टक्के द्वितीय, विशाल गायचोर ६० टक्के तृतीय तर कंन्ट्रक्शन टेक्नॉलॉजीत विठ्ठल गावडे ६९.३३ टक्के प्रथम, कुणाल पेडणेकर ६७.१७ टक्के द्वितीय, अर्जून परब ५९.१७ टक्के तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीत १०० पैकी १०० गुण पुजा सरमळकर, सिद्धी कुबडे, हर्षिता सुर्यवंशी, ज्योती नाटलेकर यांनी प्राप्त केले.

मिलाग्रीस कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
वाणिज्य शाखेत एरिका ऑगस्टीन डिसूझा 91.33 टक्के प्रथम, मेलिसा पीटर फर्नांडिस 83.83 टक्के द्वितीय, फ्रेडी फिलिक्स फर्नांडिस 83.50 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शाखेतून करिश्मा काशीराम ठाकूर ८०.६७ टक्के प्रथम, ब्रायन पीटर परेरा 75.17 टक्के द्वितीय, हर्षदा हेमंत कांबळी 70.83 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे HSC बारावी वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात प्रथम गौरवी अंकुश दाभोलकर 81.67 टक्के, द्वितीय संजना सुरेश गावडे -81.50 टक्के, जान्हवी गणेश सोन्सूरकर 80.67 टक्के गुण मिळवत तृतीय ठरली आहे. बारावी कला
निकाल 92.30 टक्के लागला असून प्रथम संध्या मोहन राऊळ 87.17 टक्के, द्वितीय-सानिया संदीप राऊळ 68.50 टक्के,प्रज्ञा श्रीराम गवंडी 55.17 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

आंबोली आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेने सलग १३व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये शाळेमधून कॅडेट सुजल संतोष साटेलकर याने ८०.३३ टक्के गुण मिळवून प्रथम, कॅडेट- अविष्कार राजेंद्र पाटील याने ७४.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कॅडेट दत्तराज प्रसाद नराम यान ७३.८३ टक्के गुण मिळवून तृतीय कमांक पटकावला आहे.

तळवडे श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (कला), तळवडेचा १२ वीचा निकाल ९०.२४ टक्के लागला आहे. ४१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण होवून कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९०.२४ टक्के एवढा लागला आहे. शोनान परब ७५.३३ टक्के प्रथम, दत्तप्रसाद गुळेकर ७४.५० टक्के द्वितीय, विनय शेळके ६९.८३ टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

कळसुलर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीचा निकाल ७६.६६ टक्के एवढा लागला. कला विभागात किर्ती सावंत ६७.८३ टक्के प्रथम, द्वितीय कानू बरागडे ६५.१७ टक्के, तृतीय सलोनी पाटीलनं ६५ टक्के प्राप्त केलेत. वाणिज्य विभागातून नामदेव परब ७६.६७ टक्के प्रथम, दर्शना शिंदे ६१.३३ टक्के द्वितीय, स्नेहल दाभोलकरनं ६०.८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महविद्यालयाचा निकाल ८४.२१ टक्के लागला आहे. समिधा प्रशांत कांबळी ७९.३३ टक्के गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आली. श्रेया राजाराम परब ७८ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर रजनी उमेश रेडकर ६९.३३ टक्के मिळवून तृतीय आली.

सांगेली येथील माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली विद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
यामध्ये कला शाखेकडून सचिन सुनील खोत हा ८१ टक्के टक्के गुण मिळवत प्रथम आला कु. संकेत संतोष सांगेलकर याने ६७.६७ टक्के गुण मिळत द्वितीय तर कुमार अर्जुन गणपत पारधी ५८.५० टक्के गुण मिळवत तिसरा आला.
वाणिज्य शाखेकडून कुमारी सानिया बापू पवार ७१.१७ टक्के गुण मिळवत प्रथम आली तर विष्णू गुणाजी परब ६८.३३ टक्के गुण मिळवत द्वितीय, कुमारी गौरी विजय राणे हिने ६७.५० टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक प्राप्त केला.
तर विज्ञान शाखेकडून कुमारी सानिया शामराव जाधव ७४ टक्के टक्के गुण मिळवत प्रथम, कुमार भूषण सोमा सावंत ७० टक्के गुण मिळवत द्वितीय तर कुमारी साक्षी सुनील पवार ६८ टक्के गुण मिळवत तिसरी आली.
दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२३ या शैक्षणिक वर्षात विद्यालयातून एकूण ९४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला त्यापैकी एका विद्यार्थ्याने विशेष प्राविण्य मिळवले तर ४४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी ४७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर उर्वरित दोन विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी प्राप्त केली.

बांदा धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदाचा बारावीचा निकाल ९६.६६ टक्के लागला आहे. एकूण ३३० पैकी ३१९ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. महाविद्यालयातून अकाउंटिंग ऑफिस मॅनेजमेंट शाखेचा शांताराम मंगेश सावंत हा ८८.१७ टक्के गुण मिळवून प्रथम आला. विज्ञान शाखेचा प्रणव प्रकाश नाईक ८६.१६ टक्के गुण मिळवून द्वितीय तर वाणिज्य शाखेचा जतिन महेश देसाई हा ८५.६६ गुण मिळवून तृतीय आला.

विज्ञान शाखेतून ९६ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. या शाखेतून प्रणव प्रकाश नाईक (८६.१६ टक्के), अशोक साईनाथ मयेकर (८१.३३ टक्के), श्रावणी सुशिल देसाई (७८ टक्के).

कला शाखेतून १०४ पैकी ९५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९१.३४ टक्के लागला. या शाखेतून सुगंधा कृष्णा गावडे, (८३.३३ टक्के), तन्वी नारायण वझे (७९.१६ टक्के), वैशाली भरत राऊळ (७८.३३ टक्के).

वाणिज्य शाखेतून १०४ पैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९८.७० टक्के लागला. या शाखेतून जतिन महेश देसाई (८५.६६टक्के), शालीनी विष्णू नाईक (८५ टक्के), पूजाकुमारी दिनेशकुमार माळी (८३.८३ टक्के).

व्यवसायिक शाखेतून २६ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. हॉर्टिकल्चर शाखेतून रितेश विजय राणे (७८.३३ टक्के ), दत्ताराम श्यामसुंदर बांदेकर (५६.८३ टक्के ), अकाउंटिंग आँफिस मेनेजमेन्ट शाखेतून शांताराम मंगेश सावंत (८८.१७ टक्के ), उमेश गोविंदराज सावंत (७५.८३ टक्के ), अश्विनी आत्माराम घाडी ( ६८.१७ टक्के ). इलेक्ट्रिकल टेक्नाँलोजी शाखेतून सिध्देश बाळकृष्ण गवस ( ८१.३३ टक्के ), सचिन सत्यवान देसाई ( ७६.५० टक्के ), आयुष विनायक दळवी (७५ टक्के ) हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा