You are currently viewing आंबोली सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलजेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

आंबोली सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलजेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

आंबोली :

आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेने सलग १३व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून ०१ विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता तर उर्वरीत सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उर्तीण झाले आहेत. यामध्ये शाळेमधून कॅडेट- सुजल संतोष साटेलकर याने ८०.३३ टक्के गुण मिळवून प्रथम, कॅडेट- अविष्कार राजेंद्र पाटील याने ७४.८३ टक्के गुण मिळवून व्दितीय तर कॅडेट- दत्तराज प्रसाद नराम यान ७३.८३ टक्के गुण मिळवून तृतीय
कमांक पटकावला आहे.

आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी NDA लेखी परिक्षेत तसेच JEE CET, NEET परीक्षेत यश प्राप्त केले आहे. शाळेचे अनेक विद्यार्थी आर्मी, नेव्ही, मर्चंट नेव्ही, बहुराष्ट्रीय कंपनी आदी क्षेत्रात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत.

शाळेत निवासी सैन्य प्रशिक्षण कवायत, युध्द कौशल्य आत्मसंरक्षण, विविध साहसी खेळ व स्पर्धात्मक परीक्षांचे मागदर्शन केले जाते.

१०० टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री. पि. एफ. डॉन्टस, सचिव श्री सुनिल राऊळ तसेच संचालक श्री जॉय डॉन्टस, श्री शंकर गावडे, श्री शिवाजी परब व सर्व संचालक कार्यालयीन सचिव श्री दिपक राऊळ सैनिक स्कूलचे प्राचार्य श्री नितीन गावडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 3 =