अनधिकृत वाळू उपशावर बंदी घालण्याची मागणी
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील अवैध वाळू उपशावर प्रतिबंध घालुन अधिकृत वाळूची लिलाव प्रक्रिया राबवून जिल्ह्यातील जनतेला अल्प दरात वाळू पुरवठा व्हावा या मागणींसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मनसेच्यावतीने आमदार जीजी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय, वाळू आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, एकदाच घुसणार मनसेच दिसणार अशा घोषणांनी मनसेने परिसर दणादुून सोडला.
यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, दया मेस्त्री, सचिन तावडे, दत्ताराम बिडवाडकर, कुणाल किनळेकर, राजेश टंगसाळी, बाबल गावडे, विनोद सांडव, आपा मांजरेकर, गुरू गवंडे, चंदन मेस्त्री, बाळा पावसकर, बाळकृष्ण ठाकूर, आशिष सुभेदार, सचिन ठाकूर, अविनाश अणावकर, अमित इब्राहिमपूरकर यासंह असंख्य पदाधिकारी तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
जिल्ह्यात वाळूच्या भरमसाट दर वाढीमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प आहेत. याचा थेट परिणाम बांधकाम कामगारांच्या रोजी रोटी वर होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाचा महसूल बुडवून चोरटी वाळू विक्री गोवा राज्यात केली जात आहे. एकीकडे वाळूमाफिया व भ्रष्ट अधिकारी, तलाठी व मंडळ तलाठी आधिकारी यांच्या संगनमताने जिल्ह्यातील वाळूचा दिवसाढवळ्या गोवा राज्यात पुरवठा होत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील जनतेला चोरट्या वाळूचे दर परवडत नसल्याने घर बांधकामे थांबली आहेत. जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय रेंगाळला असून याचा फटका बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. देवली, आंबेरी, चिपी, कवठी, कालावल खाडी आदी क्षेत्रात होणाऱ्या अवैध वाळू उपशाची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्ह्यातील अवैध वाळू उपशावर प्रतिबंध घालुन अधिकृत वाळूची लिलाव प्रक्रिया राबवून जिल्ह्यातील जनतेला अल्प दरात वाळू पुरवठा व्हावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन माजी आमदार जीजी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी निवासी जिल्ह्याधिकारी, खनिकर्म आधिकारी व मनसे शिष्टमंडळ यांच्यात चर्चा होऊन कठोर कारवाई करण्याची ग्वाही महसूल प्रशासनाने दिली. पूल परिसरात