You are currently viewing वेताळ बांबर्डेला आगीत घरासह बागायतीची हानी..

वेताळ बांबर्डेला आगीत घरासह बागायतीची हानी..

कुडाळ

वेताळ बांबर्डे- गडकरीवाडी- वाघभाटलेवाडी येथे लागलेल्या भीषण आगीत बागायतीसह घराचे मोठे नुकसान झाले. ही घटना आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, त्यात सुमारे चार लाख ८० हजारांचे नुकसान झाले. आगीत गडकरीवाडी येथील चंद्रकांत महादेव गायकवाड यांच्या काजू, नारळ बागेचे मोठे नुकसान झाले. त्यांची सुमारे ४५ काजू कलमे खाक झाली. यात अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. दीपक पुरुषोत्तम !- बांबर्डेकर यांच्या घरालाही आग लागून थे लाकडी सामान, पत्रे, खुर्च्या, वीज ह फिटिंग यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे ना नुकसान झाले. विठ्ठल भगवान पार्ट व अरविंद बाळकृष्ण डांगे यांच्या शेतातील चे गोवर जळून अनुक्रमे १० हजार व पाच 7. हजार रुपयांचे नुकसान झाले. रवींद्र गावडे यांच्या गवताची गंजी जळून १५ रे हजारांचे नुकसान झाले. वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, पोलिसपाटील दीपाली भोगले, ग्रामपंचायत सदस्य साजूराम नाईक, देवेंद्र सामंत, राजू यादव यांनी नुकसानाची पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा