You are currently viewing भाजपा वेंगुर्लाच्या वतीने एसटी डेपो बाहेर सरकारच्या विरोधात आंदोलन…

भाजपा वेंगुर्लाच्या वतीने एसटी डेपो बाहेर सरकारच्या विरोधात आंदोलन…

वेंगुर्ला :-

एस्.टी. कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असून सरकारचा निषेध करण्यासाठी तसेच एस् टी कर्मचारयांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी भाजपा वेंगुर्लेच्या वतीने एस. टी. डेपो बाहेर सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

गेल्या काही महिन्यापासून एस्. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेले नसल्याने अनेक ठीकाणी एस्. टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या काळातही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व योग्यरीत्या पार पाडत राज्यातील अनेक एस्. टी कर्मचाऱ्यांनी काम सुरु ठेवले होते. मात्र लाॅकडाऊन मध्ये आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने आणि आपल्या कुटुंबाला पोसण्यासाठी काहीच मार्ग न उरल्याने त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. या सर्व घटनांसाठी केवळ राज्य सरकार जबाबदार असुन त्यांच्यामुळेच राज्यावर ही आजची परिस्थिती ओढवलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील मनोज चौधरी यांनी ज्या कारणांमुळे आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली, त्याच कारणाने रत्नागिरी डेपोचे चालक पांडुरंग गडदे यांनीही आत्महत्या केली. यासाठी राज्यसरकारला वेळीच वठणीवर आणण्याची गरज आहे. ज्या राज्यातील जनतेने निवडून दिले त्याच जनतेच्या जिवावर हे निर्दयी सरकार उठले आहे. बेस्ट वर ताण येत असल्याने एस् टी कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवीले. मात्र तिथेही त्यांना सोयीसुविधा पुरविल्या गेल्या नाहीत. त्यांची भोजन व्यवस्था नाही आणि त्यांना थेट कोवीड सेंटरमध्ये राहण्यास पाठवीले गेले. या क्रूर वागणुकीमुळे व बेजबाबदार पणामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. या सर्व गोष्टीं विरोधात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. थकीत वेतनामुळे हजारो एस् टी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले आहेत. कुटुंबाला पोसण्यासाठी त्यांनी कुठे जायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे .महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या घरात ऐन दिवाळीत अंधार असणाऱ्या या अपयशी ठाकरे सरकारच्या विरोधात ऐन दिवाळीतच आंदोलनाचा जाळ काढण्याची वेळ जनतेवर आली असुन भारतीय जनता पार्टी भक्कमपणे या सर्व अन्यायग्रस्त कर्मचारयांच्या पाठीशी रहात निषेध आंदोलन केले.यावेळी वेंगुर्ले डेपोच्या बाहेर काळे झेंडें घेऊन भाजपा वेंगुर्लेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, एस् टी कामगारांचे नेते प्रकाश रेगे, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, जेष्ठ नेते बाळा सावंत, मच्छिमार नेते वसंत तांडेल, ता. चिटणीस जयंत मोंडकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, अमेय धुरी, निलय नाईक, श्रीकृष्ण हळदणकर, राहुल मोर्डेकर, तन्मय जोशी, शरद मेस्त्री, तुळस सरपंच शंकर घारे, विनय गोरे, कौस्तुभ वायंगणकर, हेमंत गावडे, भुषण आंगचेकर, गितेश शणई, कल्पेश डेरे इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा