देवगड :
श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण पुरस्कार प्राप्त श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर याना “स्वामी रत्न पुरस्कार २०२३” घोषित झाला आहे. समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समिती अक्कलकोट या संस्थेने श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्याना राज्यस्तरीय “स्वामीरत्न पुरस्कार २०२३” घोषित केला आहे. दिनांक ३० मे २०२३ रोजी पूणे येथील श्री अण्णाभाऊ साठे सभागृहात, वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटचे अध्यक्ष श्री.महेशराव कल्याणराव इंगळे आणि चोळप्पा महाराजांचे वंशज वे.शा.सं.श्री.अन्नू गुरुजी यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पेडणेकर हे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात गेली वीस वर्षे उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था कडून घेतली जात आहे. यापूर्वीहुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याकारी संस्था कराड यांनी त्यांच्या धार्मिक व समाजसेवेची दखल घेऊन त्याना ९ वा राष्ट्रीय अक्कलकोट भूषण हा पुरस्कार २०२२ साली अक्कलकोट येथे प्रदान केला होता. समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समिती अक्कलकोट यासामाजिक संस्थेकडून नंदकुमार पेडणेकर याना स्वामी रत्न पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अभिनंदन होत आहे