*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*भावनांची रद्दी*
” अग! मी मघापासून इतकं बोलते आहे, तुला आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांबद्दल सांगते आहे, पण तू काहीच बोलत नाहीस? नुसती गप्प. फक्त हं—हुं इतकच? अगं काहीतरी मत, विचार, तुझ्या भावना व्यक्त करशील की नाही? तुझ्यासारख्या बुद्धीवादी, तर्क संगत, संवेदनशील व्यक्तीने हे असं गप्प राहणं अपेक्षितच नाही. कमाल वाटते मला तुझी. मी तुला एक व्हिडिओ पाठवते. तो तरी बघ लक्ष देऊन.”
सुचेता तावातवाने नुसती बोलत होती. पण का कोण जाणे मला माझ्या काहीही प्रतिक्रिया नोंदवाव्याशा वाटल्या नाहीत.
त्यानंतर तिने मला मोडीतच काढले. म्हणाली, “तुझ्यासारख्या तोंड बंद करून, कान आणि डोळे झाकून समाजात चालणाऱ्या व्यक्ती आहेत ना म्हणूनच या अशा घटना वारंवार घडतात. धन्य आहे तुझी!”
शेवटी तिने फोन खाडकन बंदच केला.
खरं म्हणजे मी माझ्या भावनांना आज-काल जरा रफू करून पाहत आहे.
वर्तमानपत्र उलगडलं आणि हेडलाईन्सवर नजर स्थिरावली.
” यंत्रणा मुळातून बदलावी लागेल.”
” रोड रोमिओगिरीला मिळाली सक्तमजुरीची शिक्षा.” “शिक्षकांना पेन्शनचं टेन्शन”
” लढा कामगारांच्या शोषणाविरुद्धचा”
” अपयशी संसाराची व्यथा”
” खरी कहाणी केरळ स्टोरी मागची”
” नातवाकडून आजीची हत्या”
“दान्तेवाडीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ. ११ पोलीस ठार.”
मग काही बलात्कार,भ्रष्टाचार,अंधश्रद्धाबळी,रस्त्यावरचे अपघात आणि कुठेतरी कोपर्यात “ब्राह्मोस क्रुझ क्षेपणास्त्राचे यशस्वी उड्डाण” ही बातमी.
काही सविस्तर वाचलं, काही निसटतं वाचलं आणि डोकं भणभणून गेलं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आपण पण मांडवाच्या प्रवेशद्वारातच पडलेल्या या कचर्याचं काय करायचं?
मी व्यवस्थित कागदाला कागद लावून पेपरची चापून चोपूनन घडी घातली आणि रद्दीच्या कपाटात तारीखवार लावून ठेवली. सगळ्या भावनांना आणि सगळ्या घटनांना मी आज काल रद्दीच्या कप्प्यातच ठेवून देते.
मी अशी का झाले? मी अशी होते का? मी अत्यंत संवेदनशील, हळवी, तसेच चिडणारी, संतापणारी कधी रडणारीही, प्रखरपणे रिऍक्ट होणारी व्यक्ती होते. अगदी लहानपणापासून.
मला आठवते शाळेत एका गणिताच्या परीक्षेत मी माझ्या पद्धतीने गणित सोडवले होते. ते बरोबर असूनही मांडणीत केलेल्या बदलामुळे मला बाईंनी शून्य मार्क दिले होते. तेव्हा मी मुख्याध्यापिकांच्या कक्षात जाऊन न्यायासाठी झगडले होते आणि विजयी झाले होते.
आयुष्यात जगताना असे मानहानीचे अनुभव वारंवार आले होते.
मी बँकेत नोकरी करत असताना काही घरगुती कारणामुळे माझ्या बिन पगारी रजा होत. एका नवीन आलेल्या शाखाधिकार्याने माझे पगाराचे खातेच बंद केले जे संपूर्णपणे बेकायदेशीर होते. मी एच. आर.ला सविस्तर तक्रार नोंदवली. युनियनचीही मदत घेतली नाही. कारण मला त्याची जरुरी भासली नाही. एकटीच भांडले आणि परिणामी त्या शाखाधिकार्याची एका अत्यंत खडतर ठिकाणी बदली झाली. त्यांनी नंतर क्षमायाचना वगैरे केली. ते सगळं जाऊ द्या! पण झगडले, आवाज उठवला, न्याय मिळवला हे महत्त्वाचं होतं.
माझ्या जावेला मुलगा झाला. कुटुंबात आनंदी आनंद झाला. वंशाचा दिवा जन्माला आला. त्या आनंदाच्या भरात सासूबाई म्हणाल्या,” धाकटीने माझ्या गड जिंकला.” त्या आनंदाच्या क्षणी ही मी सासूबाईंना आदरपूर्वक शब्दात म्हणाले होते,” माझ्या दोन कन्या वंशाच्या पणत्या आहेत.”
पण आता मागे वळून पाहताना सहज मनात येतं, मी इतकी भांडले, वेळोवेळी स्वतःला सिद्ध करत बसले, अनेक वेळा तर इतरांसाठीही धाव धाव धावले. नक्की काय मिळालं मला? एक जहांबाज, बेरड, पुरषी, संस्कृतीस अशोभनीय व्यक्ती असेच शिक्के घेत मी जगले. आणि हे शिक्के बाळगूनही किती अंशाने मी समाज सुधारू शकले?
“Truth is religion”
“खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे.”
“सत्यम् कंठस्य भूषणम्”
“राम रहीम एक है!”
“वसुधैव कुटुम्बकम्”
“क्षमा वीरस्य भूषणम्” अशा कित्येक सुवचनांनी बुजुर्गांनी आमचे दप्तर भरले, त्याचेही आता ओझेच झाले कां?
आज या सर्व भावनांना रफू करूनही मला माझ्या हरण्याचं समाधान भोगता येते का? याचाच प्रयोगशील वृत्तीने मी विचार करत आहे.
अफाट प्रगती झाली. तांत्रिक विकास झाला. माध्यमांच्या भरमसाट छत्र्या उघडल्या. म्हणून भल्या बुर्या घटनांचे किस्से ऐकायला, बघायला मिळत आहेत. पण आजही आयोग, निवारण समित्या, निकाल, अहवाल या कागदपत्रातच खरी मानवता गुदमरून जात आहे.
“भारत जोडो यात्रा असो”, “वज्रमुठ सभा” असो किंवा “बजरंग बली की जय!” च्या घोषणा असोत, यामागे शिजत असणाऱ्या षडयंत्रातून माझ्यासारखी प्रतिनिधिक स्वरूपातील सामान्य व्यक्ती म्हणा, नागरिक म्हणा,, मतदार म्हणा, लोकशाहीची हकदार म्हणा— तिच्या अस्तित्वाला भावनांना कुठले न्यायाचे सुरक्षित दालन मुक्त आहे?
खरं म्हणजे मी एवढंच म्हणेन आता,” अति झालं नि हसू आलं!”
आज मी माझ्या भावनांना खरोखरच रफू करते, शिवून टाकते. माझ्या गुदमरलेल्या आवाजांना मात्र वाटते— ते आवाज पुन्हा यावेत.
” सरकार काय झोपले आहे का?” असे बाणेदारपणे सवाल टाकणारे लोकमान्य पुन्हा यावेत.
” सागरा प्राण तळमळला” म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हाकेने समुद्र एकदा खवळावा.
“एक तुतारी द्या मज आणुनि।
फुंकीन जी मी स्वप्राणाने।
भेदूनि टाकीन सगळी गगने ।
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने ।
अशी तुतारी द्या मजला आणूनि।।
अशी आरोळी देणारे कवी केशवसुत अवतरावेत.
नाहीतर मग मनाची कवाडे बंद करून फक्त म्हणावे,
कानावरती हात धर
त्यातूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
सांभाळ सांभाळ लागेल पिसे
ऐकू नकोस कसला टाहो
माझ्या मना दगड हो
विसर मना दाब कढ
माझ्या मना बन दगड ।।
*राधिका भंडारकर, पुणे*
*मोब..९४२१५२३६६९*
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————