You are currently viewing सावंतवाडी शहरात नव्यानेच सुरू होतेय व्यापाराचे नवे दालन “पटेकर्स…फ्रेश मार्ट”

सावंतवाडी शहरात नव्यानेच सुरू होतेय व्यापाराचे नवे दालन “पटेकर्स…फ्रेश मार्ट”

दर्जेदार गृहप्रयोगी वस्तूंची खरेदी एकाच छताखाली…

शहर बदलतं, विकसित होतं तसतसा व्यापार वाढत जातो, व्यापारीकरण होतं… हेच ध्यानात घेऊन “बिल्डर्स अँड डेव्हलपर्स” या पारंपरिक व्यवसायासोबतच पटेकर कुटुंबीय एका नव्या व्यवसायात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खात्री आहे नक्कीच सावंतवाडीकर त्यांच्या पाठीशी राहतील. सावंतवाडी शहरात प्रथमच वातानुकूलित सुपर मार्केट सुरू करत असून गुरुवार दिनांक २५ मे २०२३ ला “पटेकर्स…फ्रेश मार्ट” चे उद्घाटन सकाळी १०.२३ वाजता आयोजित केले आहे. या उद्घाटन प्रसंगी सर्व सावंतवाडीकर, मित्र मंडळी, हितचिंतक आदींना निमंत्रित केले आहे.
“पटेकर्स फ्रेश मार्ट” या पटेकर कुटुंबियांच्या नव्या सुपर मार्केट मध्ये उत्तम प्रतीचे मुंबई मार्केटचे भुसारी सामान, कटलरी सामान, बेकरी उत्पादने, सौंदर्य प्रसाधने, सर्व प्रकारचे मसाले, खडे मसाले, विविध प्रकारची लोणची, उत्तम दर्जाची ड्रायफ्रुईट्स, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, ऑनलाईन पेक्षा स्वस्त अमेझॉन वर उपलब्ध असलेले गिफ्ट आयटेम, ब्रँडेड सॅक, स्टेशनरी सामान, बागकाम वापरासाठीच्या वस्तू, बाथरूम/टॉयलेट्स वापराचे सर्व सामान, छत्र्या, गृहपयोगी सर्व उत्पादने, अनब्रेकेबल प्लास्टिक उत्पादने, गाला कंपनीची सर्व उत्पादने, सोलापुरी चादर, ब्लांकेट्स, दोहर, बेडसिट, पायपुसनी, रजई, सतरंजी, मुलांची खेळणी, प्रसिद्ध सरवार ब्रँडची सॉस, पास्ता आदी चायनीज खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणारे सामान अशी हॉल ते किचन, बेडरूम पर्यंत वापराचे सर्व सामान एकाच छताखाली उपलब्ध केले आहे. फ्रेश मार्ट मध्ये उपलब्ध सामान आणि किमती आदी पाहिले असता ग्राहक सेवा करतानाच ग्राहकांच्या आवडी निवडी जोपासण्याचा उत्तम प्रयत्न “पटेकर्स फ्रेशमार्ट” कडून करण्यात आल्याचे दिसत आहे.
“ग्राहकांच्या सेवेत सदैव तत्पर” हे ब्रीद घेऊन मार्गक्रमण करत असतानाच ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल तशी उत्तमोत्तम सेवा देण्याचा फ्रेश मार्टचा मानस आहे. दिनांक २५ मे २०२३ रोजी सुरू होत असलेल्या सुपर मार्केटच्या उद्घाटन निमित्त ग्राहकांना “पटेकर्स फ्रेशमार्ट” कडून विविध उत्पादनांवर खास ५% ते ५०% पर्यंतची सूट ठेवण्यात आली आहे. या संधीचा अवश्य लाभ घ्या, आणि उद्घाटन प्रसंगी सदिच्छा देण्यास जरूर या असे निमंत्रण अधिक आवाहन पटेकर्स फ्रेशमार्टचे श्री.महेंद्र(मयू ) पटेकर, श्री.दीपक पटेकर, सौ.भूमी पटेकर आदी पटेकर कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा