कणकवली
ठाकरे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देत नाही. कामगारांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. एसटी कामगार आत्महत्या करू लागले आहेत या घटनेचे आज कणकवलीत पडसाद उमतलेत.भारतीय जनता पार्टी कणकवली तालुक्याच्या वतीने एसटी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लक्षवेधी आंदोलन लरण्यात आले.सरकार विरुद्ध घोषणा देत कामगारांना पगार देत नसलेल्या सरकारचा निषेध करण्यात आला. एसटी कामगारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे अशी टिक भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.
हे आंदोलन कणकवली एसटी डेपोत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, कणकवली तालुका अश्याक्ष संतोष कानडे, सोनू सावंत, महेश गुरव, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, पपू पुजारे, विजय चिंदरकर, बाळा सावंत, आप्पा सावंत, दिलीप तिर्लोटकर तसेच भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळाचे सर्व कर्मचारी ग्रामीण भागातील जनतेला अतिशय चांगली सेवा देत असून त्यांना कामचा मोबदला वेळेवर न मिळाल्यामुळे राज्यात कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे व तसे घडत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेले नसल्याने अनेक ठिकाणी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत . या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामूळे व आघाडी सरकारच्या बिघाडी कामामूळे कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ या सरकारने आणली आहे. लॉकडाऊन काळामध्ये कर्मचाऱ्यांना सांभाळणे हे कुटुंबप्रमुख म्हणून राज्य सरकारचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यात सरकार पूर्ण अयशस्वी झालेले आहे. कर्मचाऱ्यांच्या या सर्व भावनांचा भारतीय जनता पार्टी कणकवली आदर करून त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. आणि आघाडी सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन व त्यांच्या गरजा भागवण्यास विलंब केला तर भारतीय जनता पार्टी अधिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपाच्या वतीने सरकारला दिला आहे.त्याचे निवेदन तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांनी दिले.