You are currently viewing पोलीस अधिकारी अनिल व्हटकर यांची तत्परता

पोलीस अधिकारी अनिल व्हटकर यांची तत्परता

पोलीस अधिकारी अनिल व्हटकर यांची तत्परता

प्रसंगावधनाने सीपीआर देत वाचवले इसमाचे प्राण

मालवण

शुक्रवारी सायंकाळी आचरा पोलीस स्टेशन येथे दोन गटांतील वाद मिटविण्यासाठी घेतलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत एका इसमाला गुदमरल्याचा त्रास जाणवू लागल्याने आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी सदर इसमाला तातडीने सीपीआर देत शुद्धीवर आणले आणि अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने त्या इसमाचे प्राण वाचले.

आचरा जामडूल येथे संरक्षक भिंतीवरून उद्भवलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हटकर यांनी जामडूल ग्रामस्थांची बैठक बोलावली होती.यात चर्चा सुरू असतानाच आकस्मिक जामडूल येथील बुधाजी पाटील यांना छातीत दुखून अस्वस्थ वाटूनलागले आणि त्यांची शुद्ध हरपली.त्यांची ती अवस्था बघून तातडीने अनिल व्हटकर यांनी त्यांना पोलीस स्टेशन मध्येच जमिनीवर झोपवून पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाटील यांना सीपीआर देत शुद्धीवर आणले.तसेच तातडीने त्यांना आचरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करत उपचार केले.व्हटकर यांनी तत्परता दाखवत सीपीआर देऊन पाटील यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.या अगोदर सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हटकर यांनी दोन वेळा तत्परता दाखवत अपघात ग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले होते.सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या या तत्परतेमुळे पाटील यांना जिवदान मिळाले.त्यांच्यासाठी ते देवदूतच ठरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा