You are currently viewing देवगडात कासव तर कुणकेश्वर समुद्रावर डॉल्फिन मृतावस्थेत आढळला…

देवगडात कासव तर कुणकेश्वर समुद्रावर डॉल्फिन मृतावस्थेत आढळला…

देवगड

येथील समुद्रावर कासव तर कुणकेश्वर समुद्राच्या काठावर डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडला आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबत अधिक माहिती अशी की, तेथील किरण पांचाळ व कल्याणी पांचाळ या दोघांना बीचवर मॉर्निग वॉक करीत असताना एक मृत कासव दिसले. त्यांनी याबाबत तारामुंबरी येथील कांदळवन सहव्यवस्थापन समितीचे सदस्य लक्ष्मण तारी यांनी कळविल्यानंतर तारी यांनी वनविभागाचे वनरक्षक निलेश साठे यांना बोलावून मृतावस्थेत व अर्धवट कुजलेल्या कासवाला दफन केले. यावेळी पांचाळ दांपत्य, ओंकार तारी व स्थानिक उपस्थित होते.

कुणकेश्वर येथील ग्रामस्थ व इतिहास संशोधन मंडळाचे रणजित हिर्लेकर यांना सकाळी ७.३० वा.सुमारास कुणकेश्वर बीचवर मृतावस्थेत कुजलेल्या स्थितीत मासा आढळला. त्यांनीही लक्ष्मण तारी यांना कळविल्यानंतर त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे वनरक्षक निलेश साठे यांनी कुणकेश्वर ग्रामपंचायतील कळविले. यावेळी कुणकेश्वर सरपंच चंद्रकांत घाडी यांनी घटनास्थळी त्यांचे सफाई कर्मचारी अमित सावंत यांना बोलावून मृत माशाला दफन केले. साधारण साडेसहा फुट लांबीचा मासा होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 9 =