You are currently viewing बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी….

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी….

कुडाळ :

महाराष्ट्राचे द्रष्टे शिल्पकार म्हणजे यशवंतराव चव्हाण होय. पारंपरिकतेचा समन्वय साधून आधुनिकतेचा ध्यास घेणारे महापुरुष म्हणजे यशवंतराव चव्हाण होय”. असे उद्गार प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी काढले ते बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यानी आपल्या पुढील मनोगतामध्ये “महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री अशी पदे भूषवूनही ते सर्व सामान्यांचे प्रतिनिधी राहिले. सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी आयुष्यभर झटले. अशा थोर पुरुषाने शिवाजी विद्यापीठ मराठावाडा विद्यापीठ स्थापन करून शिक्षणाची दारं सर्वसामान्यांसाठी खुली केली .त्यांच्या विचाराचा आपण मागोवा घेत पुढे जाऊ या” असे सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ..     ..

यावेळी त्यांच्यासोबत महिला व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. कल्पना भंडारी ,मानव संसाधन अधिकारी पियुशा प्रभूतेंडुलकर, पल्लवी कामत व विविध अभ्यासक्रमाचे व शिक्षणक्रमाचे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.प्रा. अरुण मर्गज यांनी “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, शिक्षणासाठी मातृभाषेचे महत्त्व प्रतिपादन करणारे तत्त्वज्ञ, “सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व घडवणारे ते खरे शिक्षण.” अशी शिक्षणाची परिभाषा निश्चित करणारे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे कार्य अलौकिक आहे. त्या कार्याची आठवण ठेवून  त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणग्राहकता आत्मसात करूया, असे सांगत राष्ट्रीय पातळीवरील त्यांचे योगदान स्पष्ट करत ‘सह्याद्री धावला हिमालयाच्या मदतीला ‘.अशा शब्दात त्यांचा गौरव केला आणि त्यांच्या राज्य स्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील लोकोत्तर कामगिरीचा उपस्थितांचा परिचय करून दिला.

यावेळी उमेश गाळवणकर, व्यवस्थापकीय अधिकारी मर्ल फोनसेका ,विविध शिक्षणक्रमाचे प्राध्यापक शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + five =