You are currently viewing एक धागा सुखाचा

एक धागा सुखाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री दीपाराणी गोसावी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एक धागा सुखाचा*

 

जरी तू किती  असला श्रीमंत

नको घालवू गर्व करण्यात हयात

 

पैसा अडका न ये कामी

अंती अंघोळ ना बाथरुमात

 

जमीन जुमला ते घरदार

इथेच सोडून जावे लागणार

 

माणुसकि जप तू ह्रदयात

मदत करण्या घालव हयात

 

करूनी रक्त महादान

घे पदरी पुण्य ते छान

 

आला तो जीव पृथ्वीतलावर

मरण मार्गावर तो चालणार

 

फसवणुक नको करू कुणाची

यातना मिळती या मार्गावर

 

मदती आशिर्वाद देते

आत्मशांती रे तुझी होणार

 

जिवाला जीव देणारा

मित्र तो असावा निरंतर

 

व्यसनाधिन करणारा

मित्र नसावा तो भंयकर

 

चांगल्या सवयीचे ते

पदरी फळ मिळणार

 

सबुरी अंगी त्याच्या देव

तो सतत देत राहणार

 

जरी तू किती  असला श्रीमंत

नको घालवू गर्व करण्यात हयात

 

एक धागा सुखाचा जोड तू

आयुष्य कर आनंदी सुखकर

 

* दिपाराणी पांडुरंग गोसावी , पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा