You are currently viewing विठ्ठला विठ्ठला..

विठ्ठला विठ्ठला..

विठ्ठला विठ्ठला 🌹

 

येऊ का आषाढीला

तुझ्या दर्शनाला

 

पुन्हा एकदा वारी झाली

वारक-याची स्वारी आली

विठ्ठला विठ्ठला 🌹

 

तुझ्या नामाचा आहे गोडवा

विठ्ठल विठ्ठल नाम हे वाढवा

विठ्ठला विठ्ठला 🌹

 

दोन वर्षे गेली तुझ्या वारी विना

मनाला होत होत होत्या वेदना

तुच पाठीराखा

तुच आमुचा सखा

पूर्ण कर मनोकामना

विठ्ठला विठ्ठला🌹

 

राम कृष्ण हरी मंत्र हा सुखाचा

मान राखू संत परंपरेचा

 

विठ्ठला विठ्ठला 🌹

 

युगे 28 उभा आहे विटेवरी

कर ठेवून या कटेवरी

दिन दुबळ्यांचा तु कैवारी

 

विठ्ठला विठ्ठला🌹

येऊ का आषाडीला

 

देह भान विसरून

भक्तीच्या रसात न्हाऊन निघाला

विठ्ठला भेटण्या वारकरी आला

 

विठ्ठला विठ्ठला🌹

येऊ का आषाढीला

✍️✍️🙏🙏🙏🌹🌹

 

 

लक्ष्मण उर्फ प्रकाश धोंडी सरमळकर

ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी, कट्टा – मालवण

मो. 9545006839

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =