*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम लेख*
सहज आठवलं म्हणून
—————————————————————–
माझं गाव रायगड जिल्ह्यातलं रोहा. कुंडलिकेच्या तिरावर वसलेलं एक टूमदार गाव. औद्योगिक करणापूर्वी तर अगदी मर्यादित पसरलेलं गाव. सारेच एकमेकांना ओळखणारे. धाविर गावचा गावदेव. सर्वांची त्यावर नितांत श्रद्धा. येता जाता दिवसातून दहा वेळा तरी त्याचं नावं घेणारच. तसं इतर गावातही हा प्रकार पाहायला मिळतो. गावदेवावर नितांत श्रद्धा.महाड मधे विरेश्वरावर तर मेढ्याला वाकेश्वरावंर अशीच नितांत श्रद्धा मंडळी राखून असतं. कुणी गावात बदली वर आलं तरी धविराचा नितांत भक्त होऊन जाई. पुढे गाव सोडून गेल्यावरही पुन्हा वर्ष्यातून एकदा पालखीला येतं राही.
तर गोष्ट मी सातवित शिकत असतानाची म्हणजे एक्काहत्तर सालची. गाव अजून आस्तव्यस्त वाढायचे होते. आमच्या वर्गातील मुलांमध्ये काही कारणाने भांडणे झाली. कारणं क्षुल्लक असावं पण खरं खोटं कराची वेळ आली. पण मग आता ते करायचं कुणी? सर्वांचा विश्वासाचा आधार एकच तो म्हणजे धाविर महाराज. त्याची साक्ष काढायची म्हणजे तिथलं फुल उचलायचं. म्हणजे अंतिम सत्य. तो मुलगा त्या साठी तयार ही झाला. आमची सगळी वरात देवळात गेली. कार्यक्रम यथासांग पार ही पडला. मुलांचीही त्या मुलाच्या सत्यतेची खात्री पटली. ( नाही तर तो जळून खाक झाला असता नाही काय ?) आज इतक्या वर्ष्या नंतर हे आठवताना त्या मुलाचं नावं ही ठळक पणे आठवत “हसन मिर्झा”.
एकदा मी पेण हून रोह्याला ट्रेन ने चाललो होतो. माझ्या शेजारी एक मुस्लिम महिला बसली होती. सहज गप्पा मारताना तिने सांगितलं की ती पालीला तिच्या भावाकडे चाललेय. भावाने नवीन घर बांधलंय. त्याचा घरभरणी सारखा काही कर्यक्रम आहे. मी छान म्हटलं. मग ती सांगू लागली ” आता बघा माझा भाऊ सकाळी उठला की तुमच्या सर्व देवाना जाईल. नारळ फोडेल. मग घरी येईल. हे नेमकं काय असतं ? आपल्या आधीच्या धर्माच्या पाऊल खुणा न पुसता येणं? की शेजाऱ्याचा आई, वडिलांचा मान राखण्या सारखा त्यांच्या देवाचा चाही मान राखणं ? की पिढीजात चालत आलेला घट्ट असा धार्मिक एकोपा ?
मी मागे लिहिलं होतं.सर्वच बँकामध्ये दिवाळीचं लक्ष्मी पूजन धूम धडक्यात उत्साहाने सांजर होतं. स्त्री पुरुष सारे नवे कपडे, दागिने घालून बँकेत येतात. छान उत्साही माहोल असतो. त्यासाठी थोडे पैसे ही बँके कडून मिळतात. मी पनवेल ब्रांच ला असताना तर तिथे एक भडजीही येतं असे. तो यथासांग पूजा करून देवाला वैयक्तिक garhanehi😔घाली. म्हणजे ” या कुंटे बाई यांचा मुलगा यंदा दहाविला आहे. तो चांगल्या मार्कांने पास होऊ दे “. हे देशमुख हे खूप लांबून नोकरीं वर येतात. त्यांना रोज नीट गाडी मिळू दे. अपघाता पासून वाचव ” वगैरे. स्टाफ ही त्यांना भरभरून दक्षिणा देई. एक वर्ष मला वाटतं बँकेने पैसे पाठवणे बंद केले. त्या वेळी त्या ब्रांचला जे मॅनेजर होते त्यांनाही या गोष्टीत फारसा रस नव्हता. त्यांनी भडजीला परत पाठवले. देवा धर्मात अजिबातच रस. नसलेल्या माझ्या सारख्याला तर त्याने काहीच. फारसा फरक पडतं नव्हता.
पण आमच्यातील एक जण खूप अस्वस्थ होता. यंदा लक्ष्मी पूजन होणार नाही याने तो खूप दुखवला होता. तो आत बाहेर करत राहिला. शेवटी तो म्हणाला ” आपणच पैसे काढून सांजर करू या. त्याने कागद घेऊन वर्गणी गोळा करायची सुरवातही केली. आधी स्वतः चं नावं लिहिलं ” अब्दुल शेख ”
सध्या नाशिक मधे गाजत असलेल्या घटने वरून हे सारं आठवलं.
श्रीनिवास गडकरी
रोहा पुणे
913086130
@ सर्व हक्क सुरक्षित