You are currently viewing श्री रेडकर सर यांचे तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळी अंतर्गत ७४ वे व्याख्यान

श्री रेडकर सर यांचे तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळी अंतर्गत ७४ वे व्याख्यान

क.म. शि. प्र मंडळाचे शेठ ईश्वरदास हरिदास भाटिया हायस्कूल, बैलबाजार, कुर्ला (प), मुंबई येथे श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर यांनी 74 व्या निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानाचे पुष्प गुंफले.

तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते श्री. सत्यवान यशवंत रेडकर सर यांनी प्रतिपादन केले की “आजचा दिवस खरोखर माझ्यासाठी अविस्मरणीय दिवस आहे. ज्या शाळेत एकेकाळी नववी मध्ये नापास होऊन प्रथम क्रमांक पटकावला. कोणत्याही वकृत्व स्पर्धेमध्ये शालेय जीवनात असताना भाग घेतला नव्हता. परंतु आज मुख्य अतिथी तसेच प्रमुख मार्गदर्शक स्वरूपात तसेच उत्कृष्ट वक्ता स्वरूपात मंचावर स्थानापन्न होतो व व्याख्यान सुद्धा दिले. आज माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना मनसोक्तपणे मार्गदर्शन केले. माझ्या शाळेतील काही आजी-माजी शिक्षक सुद्धा उपस्थित होते. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना पिंजरकर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केलेच. परंतु नववी मधील माझ्या वर्गशिक्षिका, सौ. अणावकर मॅडम यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना माझ्या भूतकाळावर एक कटाक्ष टाकला.

यात अजून एक बाब उल्लेखनीय होती की १९६५ या बॅचचे माजी विद्यार्थी श्री. मोहन वस्त (भूतपूर्व सैनिक, राहणार नवी मुंबई) जे नेहमी मला कॉल तसेच मेसेज द्वारे प्रेरित करीत असतात ते आवर्जून उपस्थित होते व मंचावर माझ्या बाजूलाच स्थानापन्न होते. त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत आमचे मित्र श्री साडविलकर हे सुद्धा माझे मनोबल उंचावण्यासाठी मंचावर उपस्थित होते.

शेवटी आपला ONE MAN SHOW हाउसफुल असतोच परंतु माजी विद्यार्थी म्हणून इतर विद्यार्थ्यांच्या टाळ्या व जयघोषाने सभागृह मंत्रमुग्ध झाला होता.”

अशाप्रकारे हे ७४ वे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानाचे पुष्पगुच्छ गुंफले गेले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + eleven =