You are currently viewing ओटवणेतील बाबाजी गावकर यांचा गोवा येथे सन्मान

ओटवणेतील बाबाजी गावकर यांचा गोवा येथे सन्मान

मसावंतवाडी

ओटवणे गावचे सुपुत्र आणि ओटवणे देवस्थानचे मानकरी बाबाजी पांडूरंग गावकर यांचा पेडणे नजिक तुये – मुरमुसे येथील श्री सटीदेवी महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार कामात केलेल्या सहकार्या बद्दल श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीच्यावतीने सन्मान करण्यात आला. हा सन्मान श्री सटीदेवी महालक्ष्मी पुन:प्रतिष्ठापना सोहळ्यात गोवा हाऊसिंग बोर्ड कार्पोरेशनचे चेअरमन तथा मांद्रे मतदार संघाचे आमदार जित आरोलकर यांच्याहस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.या वेळी व्यासपिठावर पै काणे कंपनीचे संचालक सुनिल पै काणे, उत्सव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ कलशावकर, तुये ग्रामपंचायतच्या सदस्या अनिता साळगावकर, श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष सचिन कोचरेकर, सचिव सुदेश नाईक, बांधकाम समिती अध्यक्ष सुभाष साळगावकर, सचिव कृष्णा तळवणेकर, मार्गदर्शक लक्ष्मण खरवत आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबाजी गावकर यांचा ओटवणे गावच्या सामजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात मोठ योगदान आहे. ते ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा माजी उपसरपंच, ओटवणे देवस्थानचेही मानकरी आहेत. त्यांनी श्री सटीदेवी महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार कामात श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीला वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच देवस्थानच्या जीर्णोद्धारात अनेक धार्मिक विषया संदर्भात मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांच्या या सहकार्याबद्दल श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीच्यावतीने बाबाजी गावकर यांचा सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा