You are currently viewing निरुपयोगी वस्तूंच्या पुनर्वापरासाठी “आरआरआर’ केंद्राची स्थापना; उपक्रमातील सहभागींना मिळणार मोफत जैविक खत

निरुपयोगी वस्तूंच्या पुनर्वापरासाठी “आरआरआर’ केंद्राची स्थापना; उपक्रमातील सहभागींना मिळणार मोफत जैविक खत

वेंगुर्ला

केंद्र शासनाकडून सुचित केल्यानुसार वेंगुर्ला नगरपरिषदेने “मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ या अभियानांतर्गत “आरआरआर’ अर्थात “रेड¬ुस, रियुज, रिसायकल’ या केंद्राची स्थापना वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय आणि जुनी शिवाजी प्रागतिक शाळा इमारत याठिकाणी केली आहे. याचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते झाले. तसेच या उपक्रमामध्ये सहभागी होणा-या नागरिकांना नगरपरिषदेमार्फत तयार करण्यात आलेले एक किलो याप्रमाणे जैविक खत मोफत दिले जाणार आहे.
“मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’, स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत वेंगुर्ला शहरातील नागरिकांच्या घरी असलेल्या जुन्या, वापरात नसलेल्या वस्तू, पादत्राणे, कपडे, प्लास्टिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बॅग, खेळणी अशाप्रकारच्या निरुपयोगी वस्तूंचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने “आरआरआर’ या केंद्राची स्थापना केली आहे. “नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’ या ब्रिादवाक्याला अनुसरुन नागरिकांनी त्यांच्याकडील निरुपयोगी वस्तू “आरआरआर’ या केंद्रामध्ये जमा करुन त्यांना गरज असेल त्या वस्तू घेऊन जाव्यात. तरी या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =