कुडाळ :
ज्या विद्यार्थी- विद्यार्थीनींना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात बी.एस्सी नर्सिंग या चार वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांना एमएच-बी.एस्सी नर्सिंग सीईटी-2023 ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. मागील वर्षापर्यंत सदर प्रवेश हे नीट व्दारे होत होते. परंतू शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाचे प्रवेश हे इ.12 वी विज्ञान च्या गुणांवर करण्यात आले होते.
परंतू शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये बी.एस्सी नर्सिंग आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी एमएच-बी.एस्सी नर्सींग सीईटी-2023 ही सामाईक प्रवेश परीक्षा ही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचे मार्फत घेण्यात येणार आहे. सदर प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आहे. सदर परीक्षेसाठी वीद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी व नोंदणी अर्ज 17/05/2023 ते 26/05/2023 या कालवधीत निश्चित करावयाची असून दीनांक 27/05/2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.
सदर परीक्षा ही 100 गुणांची असून ती इ.12 वी च्या विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्या मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी व परीचर्या कौशल्य या विषयावर प्रत्येकी 20 गुणावर आधारीत प्रश्न (योग्य पर्याय निवडा पद्धतीने) आहेत.सदर परीक्षेचा कालावधी 1 तास 30 मी असणार असून माध्यम इंग्रजी असणार आहे.
तरी अधिक माहितीसाठी विद्यार्थी- विद्यार्थीनींनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्या www.mahacet.org या संकेत स्थळावर भेट द्यावी किंवा बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या मोफत मार्गदर्शन कक्षामध्ये संपर्क साधावा (02362-221289, 9156967881, 7057276831) असे आवाहन बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मीना जोशी तसेच बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. उमेश गाळवणकर यांनी केले आहे.