सावंतवाडी विठ्ठल मंदिरात भाजपचे घंटानाद आंदोलन….

सावंतवाडी विठ्ठल मंदिरात भाजपचे घंटानाद आंदोलन….

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे बंद करून तब्बल पाच महिने उलटूनही मंदिरे खुली न केल्याच्या निषेधार्थ सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाविकांच्या भावना विचारात घेऊन जिल्हा भाजपने सर्वत्र घंटानाद आंदोलन छेडले.
सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरात घंटानाद करून आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर,आनंद नेवगी, नगरसेविका दीपाली भालेकर, केतन आजगावकर, पुखराज पुरोहित, अजय गोंदावळे, रवी गावकर, दिलीप भालेकर, राजू सावंत, निशांत तोरस्कर, गुरु मठकर, सुमीत वाडकर आदींसह भाविक व भाजपचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा