You are currently viewing आर्थिक गणिताची जुळवाजुळव न झाल्यानेच मोर्चाची धमकी….

आर्थिक गणिताची जुळवाजुळव न झाल्यानेच मोर्चाची धमकी….

परशुराम उपरकर यांनी आता मोर्चा काढावाच…..

जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष आतिश उर्फ भाई जेठे

कणकवली
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अवैध वाळू उपसा विरोधात आता मोर्चा काढावाच असे आतिश उर्फ भाई जेठे यांनी आव्हान दिले आहे.
अलीकडेच राणा भीमदेवी थाटात उपरकर यांनी वाळू उपसा विरोधात मोठे आंदोलन करणार अशी गर्जना केली होती.परंतु ही गर्जना हवेतच विरली.वारंवार महविकास आघाडीवर उपरकर भाजपची सुपारी घेतल्याप्रमाने टीका करत असतात.परंतु जनतेच्या लेखी मात्र त्यांचा पक्ष तोडपाणी पक्ष म्हणून च गणला जातो.आताच्या हलाखीच्या जीवनात वाळू व्यावसायिक काय हाल भोगतात हे कधी उपरकर यांनी पाहिले तरी का?नुसते सेटलमेंट धंदे करण्यापेक्षा कधी वाळू व्यावसायिक यांच्याशी चर्चा केली असती तर चाललं नसतं का असा सवाल करताना उपरकर यांच्यात थोडा जरी स्वाभिमान असेल तर जाहीर केल्याप्रमाणे अवैध वाळू उपसा विरोधात आंदोलन करावे असा सणसणीत टोला आतिश उर्फ भाई जेठे यांनी लगावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − one =