You are currently viewing पाडलोस गाव ग्रुपच्या नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

पाडलोस गाव ग्रुपच्या नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

बांदा

पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून अनेक उपक्रम होतात. नुकतेच रक्तदान शिबिर यशस्वी केले, त्यानंतर आज नेत्रतपासणी शिबिर यशस्वी केले. त्यामुळे पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपची दूरदृष्टी ग्रामस्थांच्या हिताची असल्याचे प्रतिपादन पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर यांनी केले.
पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुप आयोजित ग्रामपंचायत पाडलोस व डॉ. गद्रे आय केअर आणि लेसर सेंटर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व अल्प दरात चष्मे वाटप या शिबिराच्या उद्घाटनवेळी सरपंच पेडणेकर बोलत होत्या. व्यासपीठावर उपसरपंच राजू शेटकर, डॉ.जॅक्सन डिसोझा, विकास चव्हाण, दीपक कदम, सचिन पाडलोसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गाव ग्रुपच्या नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरामध्ये ४७ ग्रामस्थांनी नेत्र तपासणी केली. सचिन पाडलोसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी नवीन कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मावळते अध्यक्ष विश्राम गावडे यांनी केले तर आभार संतोष आंबेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा