You are currently viewing उन्हाळ्यातली सकाळ

उन्हाळ्यातली सकाळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*उन्हाळ्यातली सकाळ*
———————————————-

मुला मुलींची इथे तिथे
घाई सतत दिसते
उन्हाळ्यातली सकाळही
चैतन्यमयी असते

अंगणातल्या बिछान्यात
उन्हे लवकर उतरतात
सैलावलेल्या मुलांना
हलकेच उठवतात

भटकंती गडकिल्ल्याची
एखादा पक्षी न्याहाळतो
लहानांना घेऊन कुणी
विहिरीत शड्डु ठोकतो

लवकर उजाडल्याने
मैदान गजबजते
उद्याच्या विक्रमविरांनी
सारेच भरून जाते

बोगनवेल,मधुमालती
कुंपणावर फुलते
बकुळ अन रातराणी
हलके हलके दरवळते

कोकीळ आणि तांबट
सकाळीच वर्दी देतो
फुलचूखी, वेडा राघू
झाडांवर गर्दी करतो

सुरु होतो उन्हाचा दाह
तेव्हा सारे चिडीचूप होते
त्या पूर्वी मात्र सारे
चैतन्यात न्हाते

श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@सर्व हक्क सुरक्षित
15.05.2023

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा