You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांना नियुक्ती द्या; नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांना नियुक्ती द्या; नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

सावंतवाडी

येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे ३१ मे ला वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्ती नंतर रुग्णालयाचा दर्जा तसाच रहावा यासाठी त्या ठिकाणी दोडामार्ग येथे कार्यरत असलेले डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांना या ठिकाणी नियुक्ती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. श्री. दुर्भाटकर यांनी गेली २२ वर्षे सावंतवाडी रुग्णालयात सलग सेवा दिली आहे. त्यांची अनेक वेळा बदली करण्यात आली. परंतू ती बदली रद्द होण्यासाठी अनेकांकडुन प्रयत्न करण्यात आला. मात्र आता ते ३१ तारखेला आपल्या पदावरुन निवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर त्या ठिकाणी चांगली सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काही वर्षापुर्वी सावंतवाडीत सेवा देणारे आणि आता दोडामार्ग येथे कार्यरत असलेले स्त्री-रोग तज्ञ डॉ. ऐवाळे यांना नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 1 =