You are currently viewing सावंतवाडीत पत्रकार संघातर्फे  १७ मे रोजी नेत्र तपासणी शिबिर

सावंतवाडीत पत्रकार संघातर्फे  १७ मे रोजी नेत्र तपासणी शिबिर

सावंतवाडी

येथील सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, नॅब तथा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नाशिक सिंधुदुर्ग युनिट, आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचा कार्यक्रम बुधवारी १७ मे रोजी सकाळी ९.३० वाजता सावंतवाडी भटवाडी येथील नॅब च्या नेत्र रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे नेत्र तपासणी व उपचार होणार असून, यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेत्र तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले आहे.

ही नेत्र तपासणीसाठी १७ ला सकाळी ९ वाजल्यापासून नाव नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्घाटक नॅब संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनंत उचगांवकर तर प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी च्या अध्यक्षा डॉ. विनया बाड, श्री दत्तगुरु बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे उदय भोसले, सामाजिक कार्यकर्त्या निलिमा चलवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर आदी उपस्थित राहणार आहेत. याबाबतची बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार कक्षात पार पडली.

या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सचिव मयूर चराठकर, राजू तावडे, दीपक गावकर, नरेंद्र देशपांडे आदी तालुका पत्रकार, कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा