You are currently viewing “मानवी जीवनातील दुःख हा जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनाचा गाभा!”

“मानवी जीवनातील दुःख हा जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनाचा गाभा!”

जी. ए. कुलकर्णी जन्मशताब्दीनिमित्त ग्रंथालयास प्रतिमा प्रदान

पिंपरी

“मानवी जीवनातील दुःख हा जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनाचा गाभा आहे!” असे प्रतिपादन जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक प्रा. डॉ. संजीव कुलकर्णी यांनी सोहम् सार्वजनिक ग्रंथालय, स्वरगंगा सोसायटीजवळ, संत तुकारामनगर, पिंपरी येथे शनिवार, दिनांक १३ मे रोजी केले. मराठी साहित्यातील श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कलारंजन प्रतिष्ठान आयोजित विशेष कार्यक्रमात प्रा. डॉ. संजीव कुलकर्णी बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्यवाह प्रा. माधव राजगुरू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.‌ कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.‌ या प्रसंगी कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथालयास जी. एं.ची प्रतिमा प्रदान करण्यात आली.

प्रा. डॉ. संजीव कुलकर्णी पुढे म्हणाले की, “दिवसाला पाचशे पानं या अफाट गतीने जी. ए. कुलकर्णी जागतिक साहित्याचे वाचन करीत असत. त्यामुळे मराठी साहित्यसृष्टीतील सर्वाधिक वाचन करणारा साहित्यिक असा त्यांचा नावलौकिक होता. एकांतप्रिय असणाऱ्या जी. एं.नी वैश्विक दर्जाची साहित्यनिर्मिती केली आहे. एखाद्या गूढ गुहेसारखे त्यांचे कथालेखन मानवी आकलनाच्या पलीकडचे असल्याने ते अभिजात म्हणून गणले जाते!” जी. ए. कुलकर्णी यांच्या विविध कथांचा रसग्रहणात्मक ऊहापोह करून संजीव कुलकर्णी यांनी दुर्बोध वाटत असल्यातरी त्यांच्या कथांचे वाचन करा, असे आवाहन केले.

श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविकातून, “मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या जी. ए. कुलकर्णी यांचे जन्मशताब्दीनिमित्त स्मरण करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे!” अशी भावना व्यक्त केली.
धनंजय कुलकर्णी आणि प्रा. बी. आर. माडगूळकर यांनी रसिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
प्रा. माधव राजगुरू यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकातील जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्याचा समावेश करताना आलेल्या अनुभवांचे कथन केले.

प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ नेरकर यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा