कुडाळ :
सीबीएसई बोर्ड २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कुल कुडाळला दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर बारावीचा निकाल ७५ टक्के लागला आहे.
दहावी परीक्षेत सर्व विध्यार्थी उत्तीर्ण झाले. यात हर्ष सशांक अटक व नुपूर गिरीश सातार्डेकर (९२.४ टक्के) दोघेही प्रथम क्रमांक, नेहा मिलिंद इन्सुलकर (९१ टक्के) द्वितीय, गौरी प्रसाद सावंत (८७.६ टक्के) तृतीय. तर बारावी परीक्षेत चेतन संतोष चेंदवणकर (७४ टक्के) प्रथम, नवेंदू दिनेश बांबार्डेकर (६९ टक्के) द्वितीय, लतिका संतोष राणे (६१.४ टक्के) तृतीय. यांनी यश मिळवले.
संस्था अध्यक्ष उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे-खोत उपमुख्याध्यापक विभा वझे यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी सर्व विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.