सावंतवाडी
येथील पालिकेचे कंत्राटी कर्मचारी योगेश पाटणकर (वय ४२) यांचे काल रात्री गोवा- बांबुळी येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांची तब्येत खालविल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई असा परिवार आहे.
ते पालिका कार्यालयात वसूली क्लार्क म्हणून काम करीत होते. त्यांच्या पायाला महिनाभरापुर्वी दुखापत झाली होती. त्यात त्यांना इन्फेक्शन झाले होते. त्यानंतर त्याचा परिणाम कीडनीवर झाला होता, असे त्याच्या नातेवाईकांकडुन सांगण्यात आले. दरम्यान आज सकाळी त्यांना पालिका कर्मचाऱ्यांकडुन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.