You are currently viewing स्मार्ट अंतर्गत स्थापित महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकाची जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

स्मार्ट अंतर्गत स्थापित महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकाची जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

स्मार्ट अंतर्गत स्थापित महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकाची जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

सिंधुदुर्गनगरी

 जिल्ह्यातील स्मार्ट अंतर्गत स्थापित महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकाची जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणासाठी एकूण 11 कंपनीचे 48 संचालक, उमेद व माविमचे जिल्हा,तालुकास्तरीय  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

            यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळचे जिल्हा समन्वयक अधिकारी नितीन काळे, DCO, MAVIM यांनी संचालकांना स्वयंशिस्तआर्थिक व्यवहार, नियोजन व शेतकरी उत्पादक कंपनी व संस्था यातील फरक याबद्दल मार्गदर्शन केले. संचालकांना पुढील कार्यवाही साठी शुभेच्छा दिल्या. योगेश लोणकर, Agribusiness and Management Expert, बेसिक्स लि. यांनी स्मार्ट प्रकल्पाची ओळख व उपप्रकल्प अंमलबजावणी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी मध्ये काम करताना संचालकांना अंगीकारावयाच्या गोष्टींविषयी मार्गदर्शन केले. तसेच सभासद नोंदणीस्मार्ट प्राथमिक मंजूरीचे प्रस्तावपुर्ण प्रकल्प प्रस्ताव याबद्दल चर्चा केली. अभिजीत परब, DTM, BASICS Ltd. व वैभव पवार, DMM, MSRLM यांनी  शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्देशफायदे. MOA व AOA याविषयी मार्गदर्शन केले. नितीन जावळे DM-Con./Ent.MSRLM यांनी संचालक, CEO व सभासद यांचे कर्तव्य व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. स्मार्ट जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्या UCDS expert M. A. Mutke यांनी स्मार्ट प्रकल्पाविषयी तर देविदास देसाई District Co-ordinator ATMA यांनी शेतकरी उत्पादक कंपनीसाठी अन्य योजनांविषयी मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा