You are currently viewing जुळता मैत्रीचे स्नेहबंध…!

जुळता मैत्रीचे स्नेहबंध…!

जुळता मैत्रीचे स्नेहबंध…!

रघुनाथ न्यू इंग्लिश स्कुल, कसबा वाळवे या शाळेचे सन १९८९-१९९० च्या दहावीच्या बॕचचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आपले घर, संसार , व्यवसाय, शेती सांभाळत ही बॕच आज पन्नाशीच्या घरात पोहाचली आहे. सारेजण आता स्थिरस्थावर झाले आहेत. मोठ्या झालेल्या आपल्या मुलाबाळांची मैत्री पाहून त्यांना आपल्या शालेय मैत्रीची आठवण येत राहते. शालेय जीवनातील सोनेरी दिवस आठवून मन पाखरु बनून भूतकाळात भिरभिरु लागतं. शाळेच्या अवतीभोवती घिरट्या मारु लागतं आणि मग शालेय मित्र मैत्रिणींना, बालपणीच्या सवंगड्यांना भेटण्याची ओढ निर्माण होते. एकाचे दोन, दोनाचे चार असे मित्र भेटत राहतात. सा-यांना भेटण्याची इच्छा बोलून दाखवतात. येथूनच स्नेहमेळाव्याचं बीज अंकुरतं. मग सोशल मिडीयावरुन चर्चांना उधाण येतं..भेटीगाठींचे पेव फुटतात…संपर्कांना ऊत येतो….पत्ते , मोबाईल नंबर यांचे संशोधन सुरु होतं. आणि बघता बघता स्नेहमेळाव्याचा वृक्ष बहरतो. स्नेहमेळाव्याची तारीख ठरते. पाठोपाठ स्नेहभोजनाचा मेनू, कार्यक्रमाची रुपरेषाही आखली जाते. नियोजनसमितीसोबत राबणारे हातसुद्धा पटीने वाढतात. सगळीच लगीनघाई उसळते. प्रत्येकाच्या अंगात स्नेहमेळाव्याचे चैतन्य सळसळतं. मैत्रीची ओढ, भेटीची उत्कटता आणि ज्यांच्यासोबत लहानाचे मोठे झालो त्याच संवगड्यासोबत पुन्हा डाव मांडण्याची संधी स्नेहमेळाव्याने लाभणार म्हणून प्रत्येकजण उत्साहात असतो.

आणि तो सोन्याचा दिन आनंद घेऊनच उगवला. तब्बल अडीच तपानंतर मैत्रीचे स्नेहबंध जुळण्याचा हा दिवस. सैनिक स्कूल कसबा वाळवेच्या भव्यदिव्य, सैनिकी शिस्तीच्या प्रांगणात जवळजवळ ८०ते ९० विद्यार्थी एकत्र जमले होते. मी आणि माझी मैत्रीण अंदाज घेत घेत त्या प्रशस्त हॉलमध्ये प्रवेशित झालो. खूप सारे चेहरे ओळखीचे, स्मितहास्य करत स्वागत करत होते. काहींची नावे विस्मरणात गेलेली पण तरीही हर्षभराने संवाद साधत नोंदवहीत नाव नोंदवले. प्रत्येकाची विचारपूस करत पुढे पुढे सरकत होतो. मागील बत्तीस वर्षांचा तो सोनेरीपट समोर तरळत होता.बघता बघता विद्यार्थ्यांनी हॉल खचाखच भरला.

ठीक ११ वाजता कार्यक्रमाला सुरवात झाली. संस्थेच्या संस्थापिका सौ. पाटीलकाकींनी सरस्वतीपूजन केले. काकींचे स्वागत व सत्कार केला. आमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन त्यांनी आमचा निरोप घेतला. दहावी अ च्या वर्गातील उदय पाटीलने सर्वांचे स्वागत केले तर जयवंत पाटीलने प्रास्ताविकात स्नेहमेळाव्याचा हेतू स्पष्ट केला.

आमच्यातून काही मित्र मैत्रिणींना काळाने अकाली ओढून नेले. त्यांना कंठ दाटल्या शब्दांनी श्रद्धांजली वाहिली.

इतनी शक्ती हमें देना दाता…या प्रार्थनेने सारेच वातावरण भारावून टाकले…ना सावधान ना विश्राम ना हात जोडण्याची सूचना…पण तरीही सारे यंत्रवत चालू होऊन परिपाठ झाला.

चारही तुकड्यातील प्रतिनिधींनी गुलाबपुष्प देऊन सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि मग बैठकव्यवस्था बदलून स्वपरिचयाच्या तासाला सुरवात झाली. प्रत्येकाने आपली ओळख व व्यवसाय सांगितला. पहिल्या, दुसऱ्या , आणि शेवटच्या बेंचवर बसणारी सारीच मंडळी कोण प्रगतशील शेतकरी , कोणी उद्योजक, कोणी डॉक्टर , इंजिनियर तर कोणी शिक्षक सारेच आपापल्या कार्यात अव्वल असलेले पाहून प्रत्येकाचे कौतुक वाटत होतं. स्वकष्टाने केलेली प्रगती सांगताना प्रत्येकाच्या चेह-यावरील समाधान ओसंडून वाहत होतं.

परिचयाच्या तासात दुपारची घंटा कधी झाली ते कळलंच नाही. आणि न लागलेली भूक मात्र मांसाहारी, शाकाहारी भोजनाच्या वासाने चांगलीच चाळवली . प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे शाकाहारी , मांसाहारी ताटावर ताव मारला.
यथेच्छ सुग्रास भोजन करुन मनोगताच्या तासाला सारेच बसले.

प्रत्येकाच्या मनोगतातून शालेय जीवनातील गंमती जमती ऐकून हास्याचे फवारे उडाले. रविंद्र वाळवेकर, बाळकृष्ण जाधव सौ. मनिषा पाटील यांनी त्यावेळचे संघर्षमय जीवन कथित करुन उपस्थितांची मने हेलावून टाकली.

एव्हाना अहो,जाहो वरुन सारेच अरे तुरे वर कधी आले ते कळलंच नाही आणि मग ख-या अर्थाने दहावीच्या वर्गात बसल्याचा आनंद मिळाला. आता गटागटानुसार गप्पा, चर्चा,एकमेकांना चिडवणं सुरु झालं होतं. दहावीपर्यंत कधीही न बोलणारे विद्यार्थी विद्यार्थीनी आपापसात पोक्तपणे संवाद साधत विचारपूस करत होते.

सर्व मित्र मैत्रिणींना एकत्र आणणाऱ्या व आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांचे तोंड भरुन कौतुक केले जात होते. स्नेहमेळाव्याच्या ओढीने औरंगाबाद, पुणे, सांगली, संकेश्वरवरुन सदस्यांनी आपली हजेरी लावली त्यांचेही कौतुक केले.

तब्बल ३२ वर्षानंतर बदलेले चेहरे बंदिस्त करण्यासाठी मोबाईल आणि कॕमेरामनही सज्ज झाले होते. बेंचपार्टनरसोबतची सेल्फी दाद देऊन जात होत्या. स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न मानता सारेच स्नेहमेळाव्याचा आनंद मनमुरादपणे लुटत होते. सारेजण नव्याने दहावीचा वर्ग अनुभवत होते.

स्नेहमेळाव्यातील उल्लेखनीय बाबी म्हणजे स्नेहमेळाव्यातील शिस्त, एकामेकांप्रती आदर, सहानुभूती, एकत्र येऊनसमाजासाठी विधायक कार्य करण्याचा मनसुबा , मदतीचा हात आणि शालेय जीवनातील जपलेली निरागसता हे सारं पाहून गुरुजन व आईवडिलांनी दिलेले संस्कार पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.दीपक पाटील व सौ.विद्या नलवडे यांनी केले.तर सौ.निलोफर अत्तार हिने आभार मानले.

– सौ. विद्या नलवडे ,
कोल्हापूर .

 

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा