You are currently viewing १७ व १८ मे रोजी नारुर येथे श्री देव खापरा जत्रोत्सव

१७ व १८ मे रोजी नारुर येथे श्री देव खापरा जत्रोत्सव

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील प्रसिद्ध असलेला नारुर येथील श्री देव खापरा जत्रोत्सव बुधवार दि. १७ व १८ मे रोजी साजरा होणार आहे, अशी माहिती देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीने दिली आहे. नारूर येथील श्री देव खापरा जत्रोत्सव हा प्रसिद्ध असून एक वर्ष आड करून हा उत्सव साजरा होतो.

या उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कोल्हापूर, कर्नाटक अशा विविध भागातून मोठ्या प्रमाणावर भक्त येतात. श्री देवी महालक्ष्मी मंदिराच्या पटांगणात हा जत्रोत्सव साजरा होतो. यावर्षी हा जत्रोत्सव १७ व १८ मे रोजी साजरा होणार आहे. भक्तांनी या जत्रोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 12 =