सावंतवाडी
मळगाव येथे शुक्रवारी येथील पारिजात थिएटर्स आयोजित प्रा. वसंत कानेटकर लिखित “अश्रूंची झाली फुले” हे तीन अंकी सामाजिक नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे निर्माता सुधीर भागवत असून, दिग्दर्शक शेखर पाडगावकर यांनी केले आहे. नाटकाचे नेपथ्य आणि ध्वनी संकलन पारिजात रंगमंचचे प्रो. प्रा. अमोल आरोसरकर यांनी केले असून पार्श्वसंगीत नवनाथ राऊळ यांनी दिले आहे.
नाटकाची रंगभूषा विजय निगुडकर तर प्रकाश योजना सुरेश सातार्डेकर यांनी केली आहे. या सामाजिक तीन अंकी नाटकात सुधीर भागवत, जगन्नाथ राणे, प्रफुल्ल मांजरेकर, निलेश चव्हाण, सुभाष देवळी, सुधीर राऊळ, विजय गावकर, मनोहर तेली, उत्तम अमरे, मदन शिरोडकर, सिध्दी तळकटकर, सुजाता शेलटकर, शिवप्रसाद पेडणेकर आणि शेखर पाडगावकर आदी कलाकार भूमिका साकारणार आहेत.