जिल्हाप्रमुख मा संजय पडते यांच्या हस्ते कामांचा शुभारंभ
४० लाख रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजने; ग्रामस्थांनी मानले आभार
पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या निधीतून व आमदार मा वैभवजी नाईक यांच्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सोनवडे, घोटगे, कुपवडे गावातील ४० लाख रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजने आज आ. वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या उपस्थितीत करण्यात आली. स्थानिक शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मागणीवरून विकास कामे मंजूर करण्यात आली असून त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब, खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचे आभार मानण्यात आले.
त्यामध्ये सोनवडे तर्फ कळसुली दुर्गनगर मुख्य रस्ता ते टेंबवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १० लाख, घोटगे सावंतवाडी रस्त्यालगत संरक्षण भिंत बांधणे ५ लाख, घोटगे ढवळवाडी रस्त्यालगत संरक्षण भिंत बांधणे ५ लाख, घोटगे पायरवाडी लक्ष्मण पवार यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यास मातीकाम, भराव करणे व पाईप घालणे ५ लाख, घोटगे हेळेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, कुपवडे वडाचा भरड येथे स्मशान शेड बांधणे ४ लाख, कुपवडे गवळगाव अंगणवाडी ते स्मशान भूमी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.
या प्रसंगी कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, उप तालुका प्रमुख श्री महेश सावंत, राजू गवंडे, संदीप म्हाडेश्वर, रूपेश तायशेटे, निशांत तेरसे, तेजस भोगले सोनवडे येथील ग्रामस्थ काशिराम घाडी, दीपक घाडी, गुरूनाथ मेस्त्री, रूपेश घाडीगावकर, संदीप घाडीगावकर, शब्बिर खान, अख्तर गणी खान, इलीयाज खान, आसिफ खान कुपवडे येथील राजू सावंत, वामन चव्हाण, दाजी ढवन, प्रभाकर ढवन, बाळा ढवन, पी डी सावंत, अक्षय कासले, आत्माराम कांदे, विराज सावंत, अशोक ढवन आदि ग्रामस्थ तर घोटगे येथे एकनाथ ढवण, चंदन ढवळ, सूर्याजी ढवळ, अवि नाईक, रमा पेडणेकर ,लक्ष्मण पेडणेकर ,राजाराम घोटगेकर ,बाबी चव्हाण ,साक्षी ढवळ,रेखा ढवण,सारिका ढवळ,संगीता पेडणेकर,सुभाष ढवळ,संतोष ढवण,विजय ढवळ, सुनंदा ढवळ,तरामती ढवळ,कुशा ढवळ,बाबाउ धुरी, सत्यवान ढवळ, सुधीर नाईक, रमेश रेडकर ,रमेश ढवळ, मकरंद केळूसकर ,गणेश शिंदे ,तुकाराम शिंदे ,प्रविण नाईक,चंद्र्कांत नाईक,चित्रा नाईक,मुकुंद शिंदे,अंकुश शिंदे,शंकर रेडकर, सुनील चव्हाण ,आप्पा शिंदे, मधुकर नाईक,ओंकार सावंत,गोट्या परब,किशोर परब, साहिल परब,भाविका धुरी,नीलेश परब,शरद साळगावकर,अशोक नेरूरकर व ग्रामस्थ मोठ्या प्रमात उपस्थित होते.