You are currently viewing तंबूचालकांची उद्या शिरोड्यात बैठक..

तंबूचालकांची उद्या शिरोड्यात बैठक..

वेंगुर्ले

शासनाने अकृषक कर लादल्याने संतप्त झालेल्या तंबू चालक-मालकांची बैठक शुक्रवारी सायंकाळी ४ वा. शिरोडा वेळागर सर्व्हे नं. ३९ येथे संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी अकृषक कराबरोबरच जिल्हा पर्यटन जिल्हा झाल्यानंतर विकास आराखडा अनुषंगाने चर्चा होणार आहे.

न्यास न्याहारी योजनेंतर्गत बांधलेल्या तंबूंना ५० टक्के अनुदान अद्याप न मिळाल्याने त्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करण्यासाठी चर्चा होणार आहे. सिंधुदुर्ग पर्यटन कार्यालय सक्षमपणे काम करीत नसल्याबद्दल तीव्र नाराजी असून, यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. कुणाला काही शंका व सूचना असतील तर या बैठकीत मांडण्यात याव्यात. त्यावरही यावेळी चर्चा करण्यात येईल. कुणाच्या काही समस्या असतील तर त्यावरही उहापोह होईल. या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला तंबूचालक, मालकांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष चमणकर व सचिव नामदेव भुते यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा