जबलपूर – कोईंबटूर एक्सप्रेसला मुदतवाढ
कणकवली
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या व सिंधुदुर्गातील कुडाळ, कणकवली स्थानकावर थांबा असणाऱ्या जबलपूर-कोईंबटूर- जबलपूर सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशल ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार जबलपूर- कोईंबटूर (०२१९८) ९ जून ते ३० जून या कालावधीत दर शुक्रवारी रात्री ११.५० वा. जबलपूर येथून सुटेल व रविवारी सायंकाळी ५.१० वा. कोईंबटूर येथे पोहोचेल, कोईंबटूर-जबलपूर (०२१९७) १२ जून ते ३ जुलै या कालावधीत दर सोमवारी दुपारी ३.२५ वा. कोईंबटूर येथून सुटेल व बुधवारी सकाळी ८.४५ वा. जबलपूर येथे पोहोचेल. गाडीला भुसावळ, नाशिक, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, कारवार, कुमटा, उडपी, मुलकी, मेंगलोर, कन्नूर, थिरुर आदी स्थानकांवर थांबा असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.