*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे यांना प्रतिष्ठेचा “बंधुता शब्दाक्रांती पुरस्कार” जाहीर*
*चलो पुणे…..*
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे – बंधुता प्रतिष्ठान, पुणे, – काषाय प्रकाशन, पुणे – रयत शिक्षण संस्था संचलित – डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे – भगवान महावीर शिक्षण संस्था संचालित – प्रितम प्रकाश महाविद्यालय, भोसरी, पुणे आणि भारतीय जैन संघटना संचालित – कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, वाघोली, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘बंधुता शब्दाक्रांती पुरस्कार’ साहित्यिक जयराम धोंगडे यांना जाहीर झाला.
जेष्ठ साहित्यिक, आपल्या पहाडी आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे, अतिशय हळव्या नि संवेदनशील मनाचे कवी, काषाय प्रकाशनाचे प्रकाशक, जेष्ठ बंधू आणि मार्गदर्शक आदरणीय श्री चंद्रकांतदादा वानखेडे, बंधुताचार्य आदरणीय श्री प्रकाशजी रोकडे तथा जेष्ठ कादंबरीकार, कथाकार, कवयित्री माई डॉ. नयनचंद्र सरस्वते यांचे श्री.धोंगडे यांनी ऋण व्यक्त केले.
सदरचा पुरस्कार एस.एम.जोशी सभागृह, पुणे येथे शुक्रवार दि. २ जून २०२३ ला जेष्ठ साहित्यिक, अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे भूतपूर्व अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस सर यांच्या हस्ते आणि महाराष्ट्रभरातून येणाऱ्या साहित्यिक मित्रांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे. या निमित्ताने आपणही या असे आवाहन श्री.जयराम धोंगडे यांनी केले आहे.