“अर्णब गोस्‍वामी यांच्‍या जीविताला धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची असेल”…

“अर्णब गोस्‍वामी यांच्‍या जीविताला धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची असेल”…

नारायण राणे यांचा सरकारवर हल्लाबोल

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांची रवानगी सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे. अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, यानंतर भाजपा नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असं म्हटलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा