आमदार वैभव नाईक यांची ग्वाही..
कुडाळ
दशावतारी कलाकार हे ही कला म्हणून पाहात असुन व्यवसाय म्हणून पाहात नसुन दशावतारी कला अकादमी साठी भूखंड मिळाल्यावर आमदार म्हणून दशावतारी कलावंत एकाच छताखाली येण्यासाठी निधी देऊन कायमच दशावतारी कलावंताच्या पाठीशी राहीन अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी आज दीली.
गेले आठ महिने बंद असलेली दशावतारी कला सांक्रृतीक मंत्री ना अमित देशमुख यांच्या कडुन सुरू करण्याची परवानगी आमदार वैभव नाईक यांनी मिळवुन दिली त्याबद्दल आम नाईक यांचा सत्कार पावशी येथे शांतादुर्गा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवसेना नेते अतुल बंगे अध्यक्ष दीनेश गोरे, समीर प्रभु तेंडोलकर, प्रकाश तांबे, नंदु तुळपुळे, शंकर मोर्ये, शेखर शेणई, बाळा बांबार्डे कर उपस्थित होते
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले गेले आठ महीने दशावतारी कलाकार मेटाकुटीला आले होते याची जाण मला होती म्हणून मंदीरे बंद होती त्यामुळे दशावतारी कंपनी संकटात होते आता मंदीरे सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत लोकांची काळजी घेऊनच अशा कार्यक्रमांना परवानगी मिळवुन दिली आहे जीवाची काळजी सगळ्यांनी घ्यावी असे आवाहन आम नाईक यांनी केले,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीनेश गोरे यांनी केले