*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्री मिलिंद स्वामी लिखित अप्रतिम लेख*
*Rantan kharak ट्रेक , उत्तराखंड*
*उंची 12887 फूट*
Samit day
हिमालयातल्या बोचऱ्या थंडीत पहाटे चार ला स्लीपिंग बॅग मधून बाहेर पडायचे भाग्य आज पुन्हा एकदा लाभले होते. ४.३० वाजता नाश्ता करून आम्ही सर्वजण Sumit साठी निघालो. आज कॅम्प मधून निघताना shoes वर spikes ( बर्फात पाय घसरू नये म्हणून लोखंडी grip ) चढवायला leader ने सांगितले. . Route वर चांगलाच बर्फ जमलेला असणार याची खात्री पहिल्या पाच मिनिटातच आली.
आता वर चढताना बर्फ ही पडायला लागला होता. एकंदरीत हिमालय पुन्हा एकदा माझी परीक्षा घेणार हे निश्चित झाले.
दहा हजार फूट उंची एकदा का तुम्ही क्रॉस केली की तुमची पावले आपोआप सावकाश पडू लागतात. हवेत oxigen कमी असल्याचा परिणाम.
पायही आता गुडघाभर बर्फात रुतत होते.दोन्ही बाजूला खोल दरी अन मधल्या ridge वरून चालताना चांगलाच घाम फुटला होता. बर्फ वृष्टी काही केल्या थांबायचे नाव घेत नव्हती.
आता खरा mind गेम सुरू होतो. इथे तुमच्या फिटनेस ची टेस्ट होते.
ह्यावेळी ही मी टेस्ट पास झालो.
Ranthan kharak टॉप ला पोचलो तेव्हा वर सगळीकडे ढग पसरले होते. इतके कष्ट करून शिखरावर पोचल्याचा आनंद काही औरच होता.आम्ही सर्वांनी एकमेकांना आनंदाने मिठ्या मारल्या आणि अभिनंदन केले.
काही क्षणातच ढगांची झालर बाजूला झाली.
आता आमच्या समोर पंचचुली , नंदा घुमटी घट्ट पाय रोवून उभे होते . त्यांच्या पुढे मी ह्या पृथ्वीतलावरचा अत्यंत नगण्य किडा असल्याची जाणीव होत होती. त्यांच्याकडे बघताना मला वाटतं होते की हे इतकं भव्य दिव्य , रौद्र असूनही शांत असतात आम्हा मानवाकडे इतका इगो , finincial स्टेटस …..
येतो कुठून.
माझे विचार बहुदा माझ्या आवडत्या हिमालयाला ऐकू गेलं असावेत . त्याने माझ्या कडे बघत एक छानसे smile केले , म्हणाला ” जेव्हा असे वाटेल ना की आपण फार मोठे झालोत तेव्हा माझ्या भेटीला येत जा . आता सावकाश खाली उतर.तुझ्या सारखी नातवंडे आली की मला ही जरा बरे वाटते बघ.
मी पुन्हा एकदा त्याच्या कडे डोळे भरून पाहिले अन् शांतपणे खाली उतरायला सुरुवात केली.
आता मनही खूप शांत झाले होते.
@ मिलिंद स्वामी
३०/०४/२३
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-